शिरपूर जैन,
fatal attack दुर्गा विसर्जन मिरवणुकी दरम्यान एका तरुणावर मिरवणुकीमध्ये प्राण घातक हल्ला करून त्याला जातीवाचक शिवीगाळा करून जीव मारण्याची धमकी दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर असे की, शिरपूर जैन येथे १ आटोंबर रोजी विसर्जन मिरवणूक होती. यामध्ये गावातील सर्व नवदुर्गा उत्सव मंडळांनी सहभाग घेतला होता. विसर्जन मिरवणूक पाहण्याकरता शिरपूर परिसरातील अनेक भाविक शिरपूर मध्ये दाखल झाले होते व सर्व तरुण आपापल्या मंडळासमोर बँड पथकाच्या निनादावर फिरकत होती. दरम्यान दोन तरुण मिरवणुकीमध्ये आनद घेत असताना त्याच्या एका मित्राचा दुसर्या एका मंडळातील कार्यकर्त्यास धक्का लागल्याच्या कारणावरून त्यामधील तीन कार्यकर्त्यांनी ओंकार मनोज वाढे यास लाथा बुयाने मारहाण केली.fatal attack साथीदारांनी त्याला कोण्या तरी धारदार वस्तूने छातीवर मानेवर व कानावर मारून जखमी केले तसेच त्याला अनुसूचित जमातीचा असल्याने जातीय वाचक शिवगाळा करून जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबतची तक्रार ओंकार मनोज वाडे यांनी ३ ऑटोंबर रोजी रात्री उशिरा शिरपूर पोलिस स्टेशनला दाखल केली त्यांच्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी तीन आरोपी विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणातील तिन्ही आरोपी सध्या फरार असून, या घटनेचा तपास उपविभागीय अधिकारी नवदीप अग्रवाल हे करीत आहेत.