शेंबाळपिंपरी
flood relief अतिवृष्टी व पूर यामुळे परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यांनी हिंमत हरू नये, पुन्हा जोमाने आपल्या शेती कामाला लागावे, अशा उद्देशाने पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथील नि:पक्ष महिलांनी स्वयंस्फूर्तीने बाजारपेठेत डबे फिरवून पैसे जमा केले. हे पैसे तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पाठवण्यात येणार आहेत.
सततच्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकरी, शेतमजूर, व्यवसायींचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांना आपल्या संसाराचा गाडा रुळावर आणण्यासाठी शासनाकडून मदतीची गरज आहे. वणी तालुक्यातील भांदेवाडा येथील संत जगन्नाथ महाराज संस्थेने मुख्यमंत्री सहायता निधीला 1 लाख 16 हजार 116 रुपयांची मदत दिली आहे. अध्यक्ष बबन धानोरकर व विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. संस्थेच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.