Kojagiri Purnima brings good luck आज कोजागिरी पौर्णिमेच्या पवित्र दिनी गजकेसरी, वृद्धी आणि ध्रुव योग असे तीन शुभ संयोग जुळले आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अत्यंत मंगल मानला जातो. ६ ऑक्टोबर २०२५, सोमवारचा दिवस भगवान भोलेनाथाला समर्पित असून, आजच्या पौर्णिमेला देवी लक्ष्मीची कृपा लाभणारा दिवस म्हणूनही ओळखला जातो. विशेष म्हणजे, या दिवशी ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे पाच राशींच्या जीवनात भरभराट, यश आणि धनवर्षे होणार असल्याचे ज्योतिषी सांगत आहेत.

कोजागिरी पौर्णिमा ही देवी लक्ष्मीची जयंती मानली जाते. या दिवशी रात्री चांदण्याखाली क्षीरसागरातील अमृत स्वरूप दूधपान करण्याची प्रथा आहे. चंद्राच्या तेजोमय प्रकाशात संपत्ती आणि सौभाग्याची देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते, असे मानले जाते. म्हणूनच या रात्री देवी लक्ष्मी आणि चंद्रदेवाची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि धनलाभ वाढतो. आजच्या पौर्णिमेला चंद्र आणि गुरु एकाच केंद्रात आले असून, त्यामुळे गजकेसरी योग तयार झाला आहे. Kojagiri Purnima brings good luck सूर्य आणि चंद्राच्या युतीमुळे समसप्तक योग निर्माण झाला आहे. तसेच, उत्तरभाद्रपद नक्षत्राच्या संयोगाने वृद्धी आणि ध्रुव योगही बनले आहेत. या सर्व योगांचा प्रभाव अत्यंत शुभ असून, विशेषत: वृषभ, कर्क, कन्या, मकर आणि कुंभ राशींसाठी हा दिवस भाग्यवृद्धीचा ठरणार आहे.
- वृषभ राशीच्या व्यक्तींना आज कार्यक्षेत्रात यश, बढती आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळणार आहे. व्यापारात नफा मिळेल आणि मनातील अडचणी सुटतील. मुलाखती किंवा नवीन संधींसाठी आजचा दिवस अत्यंत अनुकूल ठरेल.
- कर्क राशीच्या लोकांसाठीही आजचा दिवस फायदेशीर आहे. आर्थिक दृष्ट्या वाढ होईल, अडकलेले कामे पूर्ण होतील आणि व्यवसायात स्थैर्य मिळेल. तुमच्या प्रयत्नांना फळ मिळण्याची हीच वेळ आहे.
- कन्या राशीच्या जातकांसाठी चिंता आणि तणावाचा अंत होणार आहे. कामाच्या ठिकाणी सन्मान, प्रतिष्ठा आणि नवे लाभ मिळतील. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस उत्तम मानला जातो.
- मकर राशीच्या लोकांसाठी तर हा दिवस विशेष शुभ आहे. न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळेल आणि नशीब तुमच्या बाजूने असेल. मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होण्याची शक्यता असून, नव्या गुंतवणुकीसाठी हा दिवस अत्यंत अनुकूल ठरेल.
- कुंभ राशीच्या व्यक्तींना आज सहकाऱ्यांकडून आणि वरिष्ठांकडून मदत मिळेल. गुंतवणुकीतून नफा, व्यावसायिक प्रवासाचे यश आणि वैवाहिक जीवनात समाधान दिसेल.