किरकोळ वादातून एकावर चाकुने हल्ला

हराळ येथील घटना

    दिनांक :06-Oct-2025
Total Views |
रिसोड,
risod news तालुक्यातील हराळ येथे ३ ऑटोबर रोजी रात्री १०.३० वाजता किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमोल शंकर बच्छिरे असे जखमीचे नाव आहे.
 
 

murdur 
 
 
 
याबाबत ५ ऑटोबर रोजी अमोल चा भाऊ सुनील शंकर बच्छिरे याने रिसोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्याचा भाऊ अमोल शंकर बच्छीरे याचे सोबत प्रेम भगवान सोनुने याने एका अन्य व्यक्तीचे वेल्डिंगचे काम का करीत आहे, या कारणावरून वाद घातला व वादाचे पर्यावसण हाणामारीत झाले. या हाणामारीत प्रेम भगवान सोनुने याने त्याच्या जवळील चाकू अमोलच्या पाठीवत खुपसून जखमी केले.risod news हल्ल्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला. जखमी अवस्थेत त्यास प्रथम रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले असता पुढील उपचारासाठी डॉटरांनी त्याला वाशीम येथे पाठवले होते. मात्र, त्या ठिकाणावरून त्यास अकोला येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.