93 वर्षांनंतर यवतमाळ नपमध्ये अनुसूचित जमातीला अध्यक्षपद

ट्रायबल फोरमच्या संघर्षाला यश

    दिनांक :06-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा यवतमाळ,
Yavatmal municipal यवतमाळ नगर परिषदेच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनुसूचित जमाती प्रवर्गाला अध्यक्षपद मिळाले नव्हते. त्यामुळे हा प्रवर्ग अध्यक्षपदापासून वंचित होता. यवतमाळ नगर परिषदेच्या इतिहासात आता मात्र प्रथमच अनुसूचित जमाती प्रवर्गाला अध्यक्षपदाचा मान मिळणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने मुंबई येथे घेतलेल्या अध्यक्षपद आरक्षण सोडतीत यवतमाळ नगर परिषदेसाठी अनुसूचित जमाती महिला आरक्षित प्रवर्ग जाहीर केला आहे.
 
 
 

Yavatmal municipal  
आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्कांसाठी सातत्याने लढा देणाèया ‘ट्रायबल फोरम’ या संघटनेने 2022 पासून शासनाकडे वेळोवेळी या संदर्भात पत्रव्यवहार केला आहे. आज या संघर्षाला यश मिळाले आहे.
राज्यघटनेनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. परंतु स्थापनेपासूनच यवतमाळ नगर परिषदेत कधीच अनुसूचित जमाती प्रवर्गाला अध्यक्षपदाचे आरक्षण मिळाले नव्हते.
विधानसभेतही प्रश्न उपस्थित
ट्रायबल फोरमच्या मागणीची दखल घेऊन माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी दोन वर्षांपूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या प्रश्नानंतर शासनाने याबाबत माहिती मागवून कारवाई सुरू केली होती.
ट्रायबल फोरमच्या लढ्याला यश
गेल्या 93 वर्षांपासून आमचा घटनात्मक हक्क डावलण्यात आला होता. त्यामुळे राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य निवडणूक आयोग, नगर विकास मंत्रालय यांच्यासोबत ट्रायबल फोरमकडून वारंवार पत्रव्यवहार केला गेला होता. आज या संघर्षाला यश मिळून घटनात्मक न्याय मिळाला आहे.
अंकित नैताम
जिल्हा उपाध्यक्ष, ट्रायबल फोरम, यवतमाळ.