बुलढाणा,
Vijayadashami सर्व समाजाला सोबत घेऊन सुख, समाधान, समृद्धी सज्जन शक्तीच्या आधाराने व्यवस्था परिवर्तन आणता येऊ शकते त्यातून स्वयंरोजगार उद्योग निर्माण होऊ शकतो. पिण्याचे पाणी, पर्यावरण स्मशान भूमी, स्वच्छता उपक्रम राबविण्यासाठी जोपर्यंत समाजमन तयार होत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही आपला देश उद्योग प्रदान आहे. कृषी, गोरक्षक, वाणिज्य ,व्यापार माध्यमातून घरोघरी कुटिर उद्योग होते. भिन्न भिन्न जाती कुठल्याही प्रकारचे शस्त्र वस्त्र नक्षीकाम तयार करण्यासाठी प्राविण्य होते. संघ शताब्दी वर्षानिमित्त समाजाला परम वैभव प्राप्त करून देण्यासाठी संघटित कार्यशक्ती सज्जन शक्तीच्या माध्यमातून सर्व समाजाने पुढाकार घेऊन हिंदूत्वाचा विचार जगाच्या कल्याणासाठी स्विकारणे आवश्यक असल्याचे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र सेवा प्रमुख डॉ. उपेंद्र कुळकर्णी (छत्रपती संभाजी नगर) यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बुलढाणा नगराचा विजयादशमी आणि शस्त्रपूजन उत्सव येथील शारदा ज्ञानपीठ प्रागंणात दि. ५ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी संपन्न झाला. यावेळी प्रमुख वक्ते डॉ. उपेंद्र कुळकर्णी होते. तसेच प्रमुख अतिथी माजी उपजिल्हाधिकारी धु्रव ऑलम्पीयाड फाऊंडेशनचे बुलढाणाचे संचालक श्याम पवार व्यासपीठावर विभाग संघचालक चित्तरंजन राठी, नगर संघचालक महेश पेंडके उपस्थित होते.
प्रारंभी भारत माता व शस्त्रपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शारिरिक योग प्रात्याक्षिक स्वयंसेकांनी सादर केले. प्रास्ताविक परिचय नगरसंघचालक महेश पेंडके यांनी केले. प्रास्ताविकात माहिती देतांना संघ शताब्दी वर्षानिमित्त विविध क्षेत्रात सेवाकार्य तसेच संघ स्थापनेचा उद्देश त्यांनी सांगितला. डॉ. उपेंद्र कुळकर्णी यांनी सांगितले की सर्व समाजाच्या सहभागातून वनीकरणाच्या माध्यमाने बोडखा डोंगर हिरवागार पर्यावरणपूरक तयार करण्यात आला. आपल्या मुळ हिंदू संस्कृतीच्या विचाराने झाडांची पूजा करून पान फुल फळ आपण तोडतो. निसर्गाच्या विनाशाच्या गर्देत मनुष्यप्राणी नष्ट होण्याची शक्यता असते. मधुमष्किका निसर्गातून संपल्या तर अन्न धान्य संपणार त्यातून मनूष्य जात संपणार संध्याकाळी कुठल्याही झाडाला हात लावू नका वनस्पती मध्ये जीव असतो. त्याची वाढ होण्यासाठी त्यांच्याशी बोलत रहा सर्व समाजाच्या आर्थिक उन्नतीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग धंदे निर्माण करून रोजगार मागणारे तरूण न बनता रोजगार निर्माण करणारे बनले पाहिजे युवा व महिलांनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून ग्रामीण भागात अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी संघटित कार्य शक्तीचा अवलंब केला पाहिजे असे त्यांनी आर्वजून सांगितले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी श्याम पवार यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले सध्या भ्रमणध्वनीवर असलेल्या सोशल मिडिया , गेम्स, रिल्सच्या व्यस्नापाई लहान मुले मानसिक आजाराच्या विळख्यात सापडली आहे. त्यांना मैदानी खेळ बौद्धिक मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता निर्माण झाली असून सुज्ञ पालकांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. हिंदू संस्कृती समृद्ध जीवन पद्धती असून प्रत्येकाने तिचा अवलंब आपल्या जिवनशैलीत केला पाहिजे असे त्यांनी सांगितले. उत्सवाप्रसंगी सुभाषित राहूल कुळकर्णी, वैयक्तिक गीत प्रणय सावजी, अमृतवचन श्रीकाळकर यांनी सादर केले.
संघ शताब्दी वर्षानिमित्त विजयादशमी उत्सव पूर्वी बुलढाणा नगराचे पथसंचलन घोषपथकासह शारदा ज्ञानपीठ प्रागंण येथून तहसिल कार्यालय समोरून संगम चौक, जयस्तंभ चौक, स्टेट बँक चौक मार्गे संघस्थानावर पोहचले विविध मार्गावर राष्ट्रसेविका समिती, वनिता समाज महिला मंडळ तसेच संघप्रेमी नागरिक बंधू भगिणीनी पथसंचलनावर पुष्पवर्षाव केला. फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले.