video अरे देवा! शिखर धवनच्या कानाखाली मारायची आहे म्हणे...

सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक

    दिनांक :06-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Abrar Ahmed भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे केवळ खेळ नव्हे, तर लाखो चाहत्यांच्या भावना एकत्र उसळण्याचा क्षण असतो. आशिया कप 2025 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याने देखील तसाच तापलेला माहोल निर्माण केला. भारताने पाकिस्तानला फायनलमध्ये दणदणीत पराभव दिला, मात्र या सामन्यानंतर मैदानाबाहेरही वाद सुरूच राहिले. आता पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमद Abrar Ahmed एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आला आहे.
 

Want to hit Shikhar Dhawan under the ear Abrar Ahmed say 
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अबरार अहमद एका मुलाखतीत बोलताना दिसतो. त्याला विचारण्यात आले की, "जगातील कोणत्या क्रिकेटपटूविरुद्ध तुला बॉक्सिंग करायला आवडेल?" यावर अबरार म्हणतो, "माझ्यासमोर शिखर धवन असावा, त्याला थोबडवायचंय."त्याच्या या वक्तव्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक युजर्सनी ट्विटर, इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अबरार अहमदच्या या अपमानास्पद आणि असभ्य भाषेबद्दल निषेध व्यक्त केला आहे. काहींनी तर आयसीसीने याची दखल घ्यावी आणि कारवाई करावी, अशी मागणी देखील केली आहे.
 
 
 
 
 
शिखर धवन का झाला लक्षवेधी?
 
 
शिखर धवन सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असला तरी तो सतत चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि धवन यांच्यात सोशल मीडियावर शाब्दिक चकमक झाली होती. आफ्रिदीच्या भारतविरोधी वक्तव्याला प्रत्युत्तर देत धवनने थेट आणि ठाम शब्दांत आफ्रिदीला सुनावले होते. त्यानंतर धवनने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे पाकिस्तानच्या संघातील अनेक माजी दिग्गज खेळाडूंच्या नाराजीत भर पडली होती.भारत-पाकिस्तान सामन्यांमधील स्पर्धा ही सर्वसामान्य गोष्ट असली, तरी खेळाडूंमधील मर्यादा ओलांडणारी वैरभावना चिंतेचा विषय ठरत आहे. अबरार अहमदसारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूचे अशा प्रकारचे विधान केवळ खेळाच्या नैतिकतेच्या विरोधात नाही, तर ते संपूर्ण क्रिकेट संस्कृतीसाठी घातक मानले जात आहे.हा वाद लवकर शमण्याची शक्यता कमी असून, भारतीय चाहत्यांची भावना लक्षात घेता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) यावर स्पष्टीकरण द्यावे लागण्याची शक्यता आहे. तसेच, आयसीसीकडून देखील अशा वादग्रस्त वक्तव्यांची गंभीर दखल घेतली जाऊ शकते. मैदानावरील स्पर्धा मर्यादित ठेवणे हेच खेळाच्या हिताचे ठरेल, अन्यथा ही शाब्दिक कुरघोडी खेळाच्या पवित्रतेला गालबोट लावू शकते.