पंचाळा शिवारात वीज पडून महिलेचा मृत्यू

पतीसह दोघे जखमी

    दिनांक :06-Oct-2025
Total Views |
राजुरा,
woman killed lightning राजुरा पासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोहपरा-पंचाळा शिवारात शेतात वीज कोसळल्याने काम करीत असलेल्या ज्योत्स्ना प्रमोद कन्मपलीवार (28) या महिलेचा मृत्यू झाला. तर त्यांचा पती प्रमोद कन्मपलीवार (36) यांच्यासह आणखी दोन जण जखमी झाले आहे. ही घटना सोमवार, 6 ऑक्टोबर रोजी दुपार 3.30 वाजताच्या सुमारास घडली
 
 

 woman killed lightning, Panchala lightning incident.
कोहपरा-पंचाळा शिवारात सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. याच शिवारात पत्नी ज्योत्स्ना व पती प्रमोद कान्मपलीवार हे दाम्पत्य काम करीत होते. अचानक शिवारात वीज कोसळली व त्यात पत्नी ज्योन्स्ना कन्मपलीवार हिचा जागीच मृत्यू झाला व पती प्रमोद जखमी झालो. त्यांच्यासोबत काम करणार्‍या मंजुषा जिवतोडे (40) व मंदा कन्मपलीवार (60) दोन महिला जखमी झाल्या आहे. वीज कोसळलेल्या जागेपासून आणखी तीन व्यक्ती लांब असल्याने त्यांचा जीव वाचला. या तिघांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.