यवतमाळात बंजारा समाजाचा विराट मोर्चा

बंजारा आदिवासीच, सरकारने न्याय द्यावा : आरक्षणाची मागणी

    दिनांक :06-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा

यवतमाळ,
Yavatmal Banjara community, हैदराबाद गॅझेटिअर व सेंट्रल प्रॉव्हिन्स अँड बेरार गॅझेट, तसेच 1956 च्या करारनाम्यानुसार आणि तत्सम आयोगाच्या शिफारशीनुसार बंजारा समाजाला तत्काळ न्यायाच्या तत्त्वावर शासन निर्णय काढून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व शासकीय सवलती लागू कराव्या, या मागणीसाठी बंजाराबहुल यवतमाळ जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने बंजारा समाजाचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. सोमवार, 6 ऑक्टोबरला यवतमाळमधील आर्णी मार्गावरील संत सेवालाल महाराज चौकात बंजारा समाजबांधवांचे एकत्रीकरण झाले. त्या ठिकाणाहून जिल्हा परिषदमार्गे बसस्थानक चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यवतमाळ जिल्हा बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने शिष्टमंडळाने जिल्हाधिकाèयांना निवेदन दिले.
 

Yavatmal Banjara community, Banjara reservation demand, tribal rights protest, Scheduled Tribe certificate, government benefits, Hyderabad Gazette, Central Provinces and Berar Gazette, 1956 agreement, tribal justice, Banjara reservation committee, tribal rally Yavatmal, tribal protest Maharashtra, Banjara tribal mobilization, district collector office protest, Banjara reservation movement, tribal welfare Yavatmal, Banjara community rally, Scheduled Tribe recognition, Banjara tribal empowerment 
यामध्ये कृती समिती सदस्य डॉ. टी. सी. राठोड, नवलकिशोर राठोड, भरत राठोड, डॉ. मोहन राठोड, न. था. जाधव, श्रावण पवार, डॉ. चव्हाण, अ‍ॅड. अरुणा राठोड, अ‍ॅड. सुधाकर जाधव, अ‍ॅड. जगदीश पवार, मोहन जाधव, प्रा. प्रेम राठोड, दिनेश राठोड, बाबूसिंग राठोड, नितीन जाधव, संतोष जाधव, अनिल आडे, प्रा. संजय चव्हाण, सुभाष राठोड, भीमराव राठोड, गोपाळ चव्हाण, प्रा. किशोर राठोड यांचा समावेश होता.
या निवेदनामध्ये हैदराबाद गॅझेटियर संदर्भानुसार बंजारा समाजाला तत्काळ संविधानातील अनुच्छेद 14 व 21 प्रमाणे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर शासन निर्णय काढून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व शासकीय सवलती लागू कराव्या. मुळात बंजारा समाज हा आदिवासीच आहे. सरकारने लक्ष देऊन या समाजाला न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन दिल्यानंतर येथील पोस्टल मैदानावर बंजारा समाज बांधवांची सभा झाली. लाखोंच्या संख्येत जमलेल्या समाज बांधवांना आरक्षणाची पुढील दिशा आणि न्याय मागणीसाठी लढ्याचे स्वरूप कसे असणार याविषयी कृती समितीच्या नियोजनानुसार डॉ. टी. सी. राठोड, प्रा. आयुषी राठोड, प्रा. प्रवीण पवार, बी. डी. चव्हाण, प्रा. संदेश चव्हाण यांनी सभेला संबोधित केले.कार्यक्रमाची सुरुवात संविधान वाचनाने करण्यात आली. हे वाचन राजश्री आडे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. राठोड यांनी केले, तर आभार बंडू जाधव यांनी मानले. या सभेचे सूत्रसंचालन राजुदास जाधव यांनी केले. या भव्य मोर्चाच्या आयोजनासाठी यवतमाळ जिल्हा बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या सर्व सदस्यांनी परिशम घेतले