कर्ज विवंचनेतून युवा शेतकर्‍याची आत्महत्या

शेमलाई येथील घटना

    दिनांक :06-Oct-2025
Total Views |
कारंजा लाड,
commits suicide ताक्यातील शेमलाई येथील तरुण शेतकरी चंदन राजेंद्र दोरक (वय ३०) यांनी रविवारी रात्री घरातील टिन पत्र्याखालील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. चंदन मागील काही वर्षांपासून गंभीर आर्थिक संकटात सापडला होता. वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे गेल्या वर्षी त्याने स्वतःची दोन एकर शेती विक्रीस काढली. मात्र, त्यातूनही सर्व कर्ज फेडणे शय झाले नाही.
 

shetkari 
 
कर्जाचा ताण आणि उपजीविकेची चिंता यामुळे तो सतत मानसिक तणावाखाली होता, अशी माहिती गावकर्‍यांनी दिली. भूमिहीन झाल्यानंतर शेतमजुरी करून घरखर्च चालविणारा चंदन सतत कर्ज फेडण्याच्या दडपणाखाली होता. उरलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून बाहेर पडू न शकल्याने अखेर त्याने घरातील टिनपत्र अँगलला गळफास लावून आपले जीवन संपविले.या घटनेने गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.commits suicide चंदनच्या मागे आई-वडील, एक भाऊ आणि पत्नी असा परिवार आहे. तरुण वयात कर्जबाजारीपणामुळे केलेल्या या आत्महत्येने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या आर्थिक संकटाची जाणीव करून दिली आहे. पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून घेतली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.