नागपूर,
Mehndi festival नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून खासदार महोत्सव समितीच्या अंतर्गत महालक्ष्मी मंदिर, मधुबन लेआउट येथे मेहंदी महोत्सव संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन आसावरी कोठीवान यांनी केले होते. सर्व माता भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि १२८ हातांवर पारंपरिक मेहंदी लावण्यात आली. कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी महिला आघाडी मंडळाचे पालक मंजुषा भुरे, अध्यक्ष अंजली देशपांडे, महामंत्री सुमीत्रा सालवटकर आणि स्वाती फडणवीस यांनी उपस्थित राहून उत्साहवर्धन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महालक्ष्मी मंदिराचे अध्यक्ष शरदचंद्र लांबे यांनी मंदिर सभागृह उपलब्ध करून दिले. तसेच शुभांगी कामडी, कविता बोबडे, प्रज्ञा जोशी, राजश्री डुम्मनवार, रंजना धकिते यांनी पूर्णवेळ उपस्थिती दर्शवली. Mehndi festival कार्यक्रम पारंपरिक गाणी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मेहंदी रचनांनी सजलेला होता, ज्यामुळे उपस्थित भगिनींमध्ये आनंदाची लहर पसरली.
सौजन्य: आसावरी कोठीवान, संपर्क मित्र