नवदुर्गा उत्सवाने आकाश नगर दुमदुमले

    दिनांक :07-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Akash Nagar आकाश नगर सार्वजनिक नवदुर्गा महिला उत्सव मंडळातर्फे घटस्थापना मोठ्या उत्साहात पार पडली. या निमित्ताने दररोज विविध खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंडळातर्फे महाआरती, ऑर्केस्ट्रा (इंडियन आयडल प्रेम अंध मुलांचा), लहान मुलांचे नृत्य स्पर्धा, पारंपरिक गोंधळ, गायत्री यज्ञ, गरबा आणि शेवटच्या दिवशी महाप्रसाद या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांचे नियोजन समस्त आकाश नगर रहिवासी यांच्या एकत्रित प्रयत्नातून करण्यात आले असून परिसरात सणासुदीचे आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे.
 

Akash Nagar  
सौजन्यः सुनील धापसे, संपर्क मित्र