आर्वीत गांधी चौकात भर दुपारी खुन

    दिनांक :07-Oct-2025
Total Views |
आर्वी, 
arvi-murder-case : शहरातील गांधी चौकात भरदिवसा सलीम सबदर शाह (३०) रा. संजय नगर युवकाचा खुन करण्यात आला. या खुन प्रकरणी निखील बुरे (रा. हरदोली) याला अटक करण्यात आली आहे. ही घटना आज ७ रोजी दुपारी घडली.
 
 
jlk
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, सलीम आणि निखील यांच्यात काही काळापासून वाद सुरू होता. त्याचे पर्यावसान आज मंगळवारी दुपारी गांधी चौकात हाणामारीत झाले. दरम्यान, निखीलने धारदार शस्त्राने सलीमवर वार करून त्याला गंभीर जखमी केले. सलीमला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आर्वी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत निखील बुरे याला अटक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. गांधी चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.