कपडे धुण्यास गेलेल्या महिलेला मगरीने नेले नदीत ओढत; VIDEO बघा संपूर्ण घटना

    दिनांक :07-Oct-2025
Total Views |
जाजपूर,  
crocodile-drags-woman-into-river ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यातून एक भीषण आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कपडे धुत असताना एका मगरीने महिलेला नदीतून ओढून नेल्याचा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
 
crocodile-drags-woman-into-river
 
ही घटना बिंझारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कंटिया गावात सोमवारी दुपारी घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, बेपत्ता महिलेचे नाव सौदामिनी महाला (वय ५७) असे आहे. ती खरसरोता नदीत आंघोळ व कपडे धुण्यासाठी गेली असताना अचानक एका मगरीने तिच्यावर झडप घातली आणि तीला वेगवान प्रवाहात ओढून नेले. घटनेच्या वेळी नदीकाठावर असलेल्या ग्रामस्थांनी हा प्रसंग पाहिला आणि तातडीने तिच्या मदतीला धाव घेतली. crocodile-drags-woman-into-river त्यांनी मगरीला हुसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मगर सौदामिनीला नदीच्या खोल पाण्यात घेऊन गेली होती. गावकऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करूनही महिलेला वाचवणे शक्य झाले नाही.
सौजन्य : सोशल मीडिया 
या दुःखद घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यात मगर महिलेला नदीत ओढताना दिसते. crocodile-drags-woman-into-river हे दृश्य पाहून लोक स्तब्ध झाले आहेत आणि परिसरात सुरक्षेची अधिक मजबूत व्यवस्था करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.