कापूस विक्री नोंदणीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

*सीसीआयने दिला शेतकर्‍यांना दिलासा

    दिनांक :07-Oct-2025
Total Views |
वर्धा,
cotton sale registration जिल्ह्यात सतत पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कापसाचे उत्पन्न शेतकर्‍यांच्या हाती येण्यास उशीर होत आहे. शेतकर्‍यांना कापूस सीसीआयला विकण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, आता ३१ ऑटोबरपर्यंत मुदत वाढविण्यात आल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 

कॉटन sale  
 
 
यावर्षी जिल्ह्यात २ लाख १८ हजार ६११.४० हेटरवर कापसाची पेरणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. जवळजवळ १०० टके पेरण्या पूर्ण झाल्या. मात्र, सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकर्‍यांच्या हातात किती कापूस येईल, हे निश्चित नाही. केंद्र सरकारने यावर्षी कापसासाठी प्रति विंटल ८ हजार १०० रुपये भाव जाहीर केला आहे. खुल्या बाजारात कमी भाव देण्यात येत आहे. शेतकर्‍यांना हमीभाव मिळावा यासाठी सीसीआयने कॉटन फार्मर मोबाईल अ‍ॅप जारी केले आहे. कापूस विक्री नोंदणी करण्याची अंतिम तारीख १ सप्टेंबर होती. मात्र, कापूस अद्यापही शेतकर्‍यांच्या घरी पोहोचलेला नाही. त्यामुळे कापूस विक्री नोंदणीसाठी मुदत वाढविण्याची मागणी करण्यात येत होती.cotton sale registration ही मुदत आता ३१ ऑटोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. खाजगी संस्था सामान्यतः नवरात्र आणि दसर्‍याच्या काळात कापूस खरेदीला सुरूवात करतात. मात्र, यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. सतत ढगाळ वातावरण, पाऊस आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे कापूस बोंडांमधून बाहेर पडलाच नाही. यासाठी आठ ते दहा दिवस चांगला सूर्यप्रकाश आवश्यक आहे. वेचणीपूर्वी शेतात सीतादहीचा कार्यक्रम घेतात. हा कार्यक्रम देखील झालेला नाही. अशा स्थितीत सीसीआयने कापूस विक्रीची अंतिम मुदत वाढवल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.
यावर्षी जिल्ह्यातील प्रतिकूल परिस्थितीमुळे कापूस शेतकर्‍यांच्या घरी पोहोचण्यास उशीर होत आहे. पाने आणि बोंड झडल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शयता आहे. कापसावर होणार्‍या रोगामुळे पाने पिवळी पडून गळून पडत आहेत. अळ्यांमुळेही कोंब गळून पडत आहेत. यामुळे उत्पादनात घट होईल. सततच्या पावसामुळे कापसाची गुणवत्ता खराब होण्याची शयता आहे. परिणामी, शेतकर्‍यांना योग्य दर मिळण्याची शयताही धुसर झाली आहे.