दिल्लीच्या गौरव त्यागीची काश्मीर ते कन्याकुमारी पदयात्रा

विषमुक्त अन्नाच्या जागृतीसाठी ४ हजार किमीचा प्रवास

    दिनांक :07-Oct-2025
Total Views |
वर्धा,
gaurav tyagis बदलते वातावरण आणि वाढीव उत्पादनाच्या हव्यासापोटी पिकं विषारी बनले आहे. शेतीमध्ये रासायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे अन्न विषारी झाले आहे. हे अन्न विषमुत करण्यासाठी जनजागृती करीत दिल्लीचा तरुण गौरव त्यागी काश्मीर ते कन्याकुमारी पायी निघाला. या पदयात्रेतून तो विषमुत शेती आणि विषमुत अन्नासाठी जनजागृती करणार असून ४ हजार किलोमीटर प्रवास करण्याचा संकल्प घेऊन तो निघाला आहे. गौरव त्यागी याने सेवाग्राम आश्रमला भेट दिली. त्यानंतर भाजपा जिल्हा कार्यालयात त्याचे स्वागत करून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
 
 

त्यागी
 
 
गौरव त्यागी हा भारत अन्न शुद्धी पदयात्रा करीत वर्धेत पोहोचला. त्याने आचार्य विनोबा भावे यांच्या पवनार, सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रम येथेे विषमुत शेती आणि शुद्ध अन्न उपलब्ध करण्याच्या संघर्षावर चर्चा केली. ४० वर्षीय गौरव त्यागी मूळचे दिल्लीचे आहेत. त्यागी यांनी २६ जून रोजी काश्मीर येथील लाल चौकातून प्रवास सुरू केला. सुमारे १०३ दिवस पदयात्रा सुरू असून शुद्ध अन्नाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ९५ हजार नागरिक आणि विद्यार्थ्यांची भेट घेत जनजागृती केली आहे. त्यागी यांनी आतापर्यंत २ हजार १५० किमीचा प्रवास पूर्ण केला.gaurav tyagis ३० नोव्हेंबरपर्यंत ४ हजार किमीचा प्रवास पूर्ण करण्याचे त्यांचे ध्येय आहे. शुद्ध आणि रसायनमुत अन्नाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या आणि सेंद्रिय पद्धतींद्वारे निरोगी जीवनशैलीचा प्रचार करण्याच्या उद्देशाने या यात्रेला सर्व स्तरांवरून पाठिंबा मिळत आहे.
भाजपा कार्यालयाला भेट
उत्तरप्रदेश निवासी गौरव त्यागी यांनी काश्मीर ते कन्याकुमारी भारत अन्न शुद्ध पदयात्रेच्या माध्यमातून देशात सेंद्रिय शेती करावी याबाबत जनजागृती अभियान सुरू केले आहे. जिल्ह्यात त्यांचे आगमन झाले असता भाजपा कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यागी यांनी आपले अनुभव कथन केले. यावेळी सेंद्रीय शेती व अन्य संबंधित विषयांवर चर्चा केली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी खासदार सुरेश वाघमारे, अतुल तराळे, अर्चना वानखेडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.