रोहित-विराटच्या खेळीचा शेवट जवळ?

    दिनांक :07-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,
end of Rohit-Virat's innings near भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी मालिकेपूर्वी क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी चर्चा रंगली आहे, रोहित शर्मा आणि विराट कोहली वनडे फॉरमॅटमधूनही निवृत्ती घेणार का? ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या एकदिवसीय आणि टी-20 संघांची घोषणा झाल्यानंतर या दोन्ही दिग्गजांबाबतची ही चर्चा अधिकच गडद झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा संघात समावेश करण्यात आला असला तरी, कर्णधारपदाची जबाबदारी यावेळी शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. यामुळे रोहितच्या भविष्यातील भूमिकेबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
 
 
end of Rohit-Virat
सूत्रांच्या माहितीनुसार, दोघांनीही अद्याप बीसीसीआयला आपल्या वनडे निवृत्तीबाबत कोणतेही औपचारिक संकेत दिलेले नाहीत, मात्र 2027 च्या विश्वचषकापर्यंत खेळणार का याबाबत कोणताही निर्णय त्यांनी घेतलेला नाही. टीम इंडियाच्या निवडीदरम्यान पत्रकारांनी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना याच प्रश्नावर विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट सांगितले की, “रोहित आणि विराट सध्या या विषयावर काहीही भाष्य करू इच्छित नाहीत. यामुळे दोघांच्या करिअरबाबतच्या अटकळींना आणखी हवा मिळाली आहे. रोहित शर्मा सध्या ३८ वर्षांचा आहे आणि २०२७ च्या विश्वचषकाच्या वेळी तो ४० वर्षांचा होईल, तर विराट कोहली ३६ वर्षांचा असून त्या वेळी ३८ वर्षांचा होईल. end of Rohit-Virat's innings near त्यामुळे दोघांसाठी फिटनेस आणि सातत्य राखणे मोठे आव्हान असेल. दरम्यान, माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी मत व्यक्त केले की, रोहितने विश्वचषकात खेळायचे असल्यास त्याने सतत तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे. त्यासाठी त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यांसोबत देशांतर्गत क्रिकेटही खेळावे लागेल.
 
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉड ग्रीनबर्ग यांनी देखील या दोन्ही खेळाडूंविषयी महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी म्हटले, “ऑस्ट्रेलियामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना खेळताना पाहण्याची ही कदाचित शेवटची संधी असेल. या विधानानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये, दुसरा २३ ऑक्टोबरला अ‍ॅडलेडमध्ये आणि तिसरा २५ ऑक्टोबरला सिडनीत खेळवला जाईल. या मालिकेसाठी भारताच्या वनडे संघाचं नेतृत्व शुभमन गिलकडे सोपवण्यात आलं असून, विराट कोहली, रोहित शर्मा, के.एल. राहुल, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश करण्यात आला आहे. तर टी-२० संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार असून, त्याच्या सहाय्यकपदी शुभमन गिल असेल. आता सर्वांचे लक्ष एका गोष्टीकडे खिळले आहे. हा ऑस्ट्रेलिया दौरा रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी शेवटचा ठरणार का? कारण या दोन्ही दिग्गजांची प्रत्येक इनिंग कदाचित क्रिकेट इतिहासातील एक नवा अध्याय ठरू शकते.