शेतकऱ्याचा वहिवाटीचा रस्ता अडविला

-तीन वर्षांपासून शेती पडित असल्याने शेतकरी हतबल -महसूलमंत्र्याच्या ‘मागेल त्याला रस्ता’ आदेशाला तिलांजली

    दिनांक :07-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड,
farmer-news : प्रत्येक शेतकèयाला शेतीत जाण्यासाठी रस्ते द्या, या महसूलमंत्री यांच्या आदेशाला उमरखेड तालुका प्रशासनाकडून तिलांजली देण्यात येत आहे. मागील 3 वर्षांपासून शेतीत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने तालुक्यातील धानोरा (सा) येथील एका शेतकèयाची शेतजमीन पडीत पडली आहे.
 
 
y7Oct-Sheti
 
शेतीत जाण्यासाठी वहिवाटीचा रस्ता द्या, अन्यथा आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचा टाहो त्याने प्रशासनासमोर फोडला आहे. मात्र अनेक वर्षांपासून महसूल प्रशासनाकडे मागणी करूनही रस्ता मिळत नसल्याने या शेतकèयावर उपासमारीची वेळ आली आहे.
 
 
धानोरा (सा) येथील माधव अंबादास इंगळे यांची शेत सर्वे नंबर 91 मध्ये 3 एकर वडिलोपार्जित शेती आहे. परंतु या शेतीच्या शेजारील पाच शेतकèयांनी त्यांचा वहिवाटीचा रस्ता मागील 3 वर्षांपासून अडविला आहे. त्यामुळे शेत वहिती करण्यासाठी रस्ताच नसल्याने माधव इंगळे यांची शेती पडित आहे.
 
 
परिणामी, मागील तीन वर्षांपासून इंगळे यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेतकरी इंगळे यांना तत्कालीन तलाठी चव्हाण यांनी 6 मे 2024 रोजी शेतीला रितसर रस्ता दिला होता. यावेळी रस्ता अडविणाèया शेतकèयांनीही या रस्त्यासाठी हमी दर्शवित तलाठी यांच्या आदेशावर सह्या करून सहमती दर्शविली होती.
 
 
मात्र त्यानंतर याच रस्ता अडविणाèया शेतकèयांनी रस्ता होऊच दिला नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी माधव इंगळे यांनी वारंवार महसूल प्रशासनाकडे रस्त्याची मागणी केली. परंतु त्यांना गटमोजणी करून द्या, असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
 
 
मात्र गटमोजणी करण्यासाठी हजारो रुपये भरावे लागतात, ते कुठून भरायचे म्हणून शेतकèयाने शेती वहितीसाठी कुठूनही रस्ता उपलब्ध करून घ्यावा, अशी मागणी केली असून रस्ता न दिल्यास आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले आहे.