फुटाळा तलाव ‘पानथळ’ जागा नाही; बांधकामांना सर्वाेच्च न्यायालयाची परवानगी

- स्वच्छ असाेसिएशनसंस्थेची याचिका फेटाळली

    दिनांक :07-Oct-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
futala-lake : नागपूरच्या फुटाळा तलाव परिसरातील बांधकामांना अखेर सर्वाेच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. मंगळवारी (7 ऑक्टाेबर) सर्वाेच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला निर्णय कायम ठेवत, फुटाळा तलावाला ‘वेटलँड’ म्हणजेच पानथळ म्हणून घाेषित करण्यास नकार दिला. त्यामुळे राज्य सरकारला फुटाळा तलाव परिसरात विकासात्मक स्वरुपाची बांधकामे करण्याचा मार्ग माेकळा झाला आहे. ही सुनावणी सरन्यायाधीश भूषण गवई, न्यायमूर्ती के. विनाेद चंद्रन आणि न्यायमूर्ती एन.व्ही.अंजारिया यांच्या न्यायपिठासमक्ष झाली.
 
 

futala 
 
 
 
नागपुरातील स्वच्छ असाेसिएशन या स्वयंसेवी संस्थेची फुटाळा तलाव बांधकाम विराेधातील याचिका सर्वाेच्च न्यायालयाने ेटाळून लावली. संस्थेने जनहित याचिकेद्वारे फुटाळा तलाव परिसरातील तात्पुरत्या बांधकामांविराेधात आक्षेप घेतला हाेता. याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला हाेता की, तलाव परिसर ‘वेटलँड्स (संरक्षण व व्यवस्थापन) नियम, 2017’ च्या कक्षेत येताे आणि तेथे फ्लाेटिंग रेस्टाॅरंट, बँक्वेट हाॅल, म्युझिकल फाउंटन व व्ह्युइंग गॅलरीसारखी बांधकामे केल्यास पर्यावरणीय समताेल बिघडू शकताे. मात्र, नागपूर उच्च न्यायालयाने राज्य प्रशासनाच्या बाजूने निर्णय देत, या बांधकामांना परवानगी दिली हाेती. सर्वाेच्च न्यायालयाने आज मंगळवारी उच्च न्यायालयाचा ताेच निर्णय कायम ठेवला.
 
 
सर्वाेच्च न्यायालयाने नमूद केले की, फुताळा तलाव ‘वेटलँड’च्या परिभाषेत बसत नाही आणि प्रस्तावित संरचना या केवळ तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन हाेत असल्याचा दावा ग्राह्य धरता येत नाही. या निर्णयामुळे फुताळा तलाव परिसरात उभारण्यात येणाऱ्या आधुनिक प्रकल्पांना, फ्लाेटिंग रेस्टाॅरंट, संगीतमय कारंजे आणि प्रेक्षक गॅलरी इत्यादी कामांना आता गती मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांंपासून फुटाळ्यातील बांधकामाला स्थगिती हाेती. त्यामुळे नागपूरकर एका मनाेरंजनाच्या ठिकाणाला मुकले हाेते. अनेकांना फुटाळा तलावावरील म्युझिक फाऊंटेन आणि अन्य सुविधांबाबत उत्सूकता हाेती. मात्र, सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आता येत्या काही महिन्यांतच फुटाळ्यावरील बांधकाम पूर्णत्वास जाऊन नागपूरकरांच्या सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
 
 
असा आहे फुटाळा प्रकल्प
 
 
फुटाळा तलावावर उभारलेल्या प्रकल्पाचा उद्देश नागपूरला पर्यटनाच्या दृष्टीने एक नवे आकर्षण देणे आणि शहरातील नागरिकांना आधुनिक व सांस्कृतिक अनुभवाची जाेड देणे हा हाेता. सुमारे 75 काेटी रुपयांहून अधिक खर्च असलेल्या या प्रकल्पाची रचना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. लेझर, 3 डी प्राेजेक्शन आणि रंगीबेरंगी प्रकाशयाेजनेचा सुंदर संगम तयार हाेताे. या शाेमध्ये मराठी, हिंदी तसेच देशभक्तीपर गीतांचा समावेश असून सुमारे 40 मिनिटांचा मल्टिमीडिया कार्यक्रम सादर केला जाताे. सुरुवातीच्या ट्रायल शाेमध्ये नागपूरकरांनी माेठ्या संख्येने उपस्थित राहून या दृश्याचा आनंद घेतला हाेता. कारंज्याचे सर्जनशील संगीत संयाेजन आणि दृश्यरचना प्रसिद्ध संगीतकारांच्या सल्ल्याने तयार करण्यात आली.