नवयुग शाळेत गांधी जयंती साजरी

    दिनांक :07-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Navyug School नवयुग प्राथमिक शाळा, राजाबाक्षा येथे प्रभात विभाग वर्ग १ व २ च्या विद्यार्थ्यांसाठी महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना देशभक्तीची जाणीव आणि महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांची ओळख करून देण्यात आली.
 
Navyug School
 
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कडू यांनी केले, तर शाळेचे जेष्ठ शिक्षक पटोले आणि जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या जेष्ठ शिक्षिका वर्षा नरसापूरकर मॅडम यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून त्यास मान्यता दिली. Navyug School कार्यक्रमाचे आभार बुरडे यांनी व्यक्त केले, तर शाळेचे मुख्याध्यापक काळे यांचे सहकार्य या कार्यक्रमाच्या यशात महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे हा उत्सव अत्यंत रंगतदार आणि संस्मरणीय झाला.
सौजन्य: वर्षा नरसापूरकर, संपर्क मित्र