हिंगणघाट,
Hinganghat News : मराठी साहित्य मंडळाद्वारे आयोजित पंधरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हिंगणघाट येथे रविवार १२ रोजी बॉम्बे सभागृहात आयोजित केले आहे.
साहित्य संमेलनाचे उद्घाटन ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्ष प्रा. डॉ. उषाकिरण थुटे यांच्या हस्ते होणार असनु संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखिका डॉ. किरण नागतोडे, स्वागताध्यक्ष डॉ. बालाजी राजुरकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर, कवयित्री ललिता गवांदे (नाशिक), रेखा दीक्षित (कोल्हापूर), डॉ. रेखा जगनाळे, डॉ. विनायक जाधव, निता चिकारे, शालू कृपाले यांची उपस्थिती राहणार आहेत.
ग्रंथ दिंडीने साहित्य संमेलनाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर परिसंवाद, राज्यस्तरीय काव्यसंमेलन होणार असून या कविसंमेलनात पंढरीनाथ मिटकर यांना जीवनगौरव, हरिहर पेंदे, स्पंदन मस्कर यांना कला भुषण, तृप्ती आंद्रे ग्रंथभुषण, डॉ. हेमंतकुमार अकलेकर, डॉ. निर्मल दरेकर वैद्यकभुषण, डॉ. अशोक काळे, डॉ. रमणिक लेनगुरे, चंदू डोंगरवार, पुष्पा दलाल, कृष्णा हिरुडकर, गुणाजी खंदारे, डॉ. किरण चव्हाण, डॉ. वर्षा गंगणे यांना साहित्य भुषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या साहित्य संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीचे डॉ. बालाजी राजुरकर, प्रभाकर कोळसे, प्रा. अभिजित डाखोरे आदींनी केले आहे.