हिमाचलमध्ये भूस्खलन, प्रवासी बस मलब्याखाली

- 15 ठार, मृतांचा आकडा वाढण्याची भिती

    दिनांक :07-Oct-2025
Total Views |
शिमला,
Landslides in Himachal : हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये भूस्खलन झाल्याची बातमी येते आहे. यात्रेकरूंच्या बसवर भूस्खलनाचा मलबा पडला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 15 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाची चमू मातीचे ढिगारे उपसून अडकलेल्या लोकांना काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.
 
 
 
landslide
 
 
 
आतापर्यंत 3 जणांना सुरक्षित काढण्यात आले असून, बसमध्ये नेमके किती प्रवासी होते? ही आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. स्थानिक लोकही बचावकार्यात सहभागी झाले असून, रात्री उशिरापर्यंत बचावकार्य चालण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खु यांनी या अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून, पिडीतांना शक्य ती सर्व मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.