खासदार नितीन गडकरी यांच्या संकल्पनेत मेहंदी महोत्सवाचा जल्लोष

    दिनांक :07-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Nitin Gadkari खासदार नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या खासदार महोत्सव समितीच्या उपक्रमांतर्गत मेहंदी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. भारतीय गृहनिर्माण सोसायटी, प्रभू नगर, न्यु मनिषनगर येथे हा रंगतदार सोहळा प्रज्ञा जोशी यांच्या प्रमुख आयोजनातून संपन्न झाला. यावेळी परिसरातील सर्व माता-भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मेहंदी महोत्सवाला पारंपरिक आणि सांस्कृतिक रंग भरले. महिलांनी एकमेकांच्या हातावर सुंदर मेहंदी डिझाईन्स रेखाटत पारंपरिक संगीतावर नृत्य करून वातावरण आनंदी केले.
 
mehndi festival
 
कार्यक्रमाला भाजपा महिला आघाडी नागपूर शहराच्या महामंत्री वंदना शर्मा, त्रिमूर्ती नगर मंडळाच्या महिला आघाडी अध्यक्षा अश्विनी सावदेकर, नरेंद्र नगर महिला आघाडी अध्यक्षा अंजली देशपांडे, तसेच प्रभाग ३५ 'ब' च्या महिला आघाडी अध्यक्षा शुभांगी कामडी यांनी भेट देऊन महिलांना प्रोत्साहन दिले. Nitin Gadkari या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री ओम शक्ती सांस्कृतिक समिती आणि श्री महालक्ष्मी दुर्गा उत्सव मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले. या वेळी आसावरी कोठीवान यांनी महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले, तर राजश्नी दुम्मनवार यांनी संपूर्ण कार्यक्रमात उपस्थित राहून सक्रिय सहकार्य केले. महिलांमध्ये उत्साह, ऐक्य आणि सृजनशीलतेचा संगम घडविणारा हा मेहंदी महोत्सव नागपूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात महिलांच्या सहभागाचे सुंदर उदाहरण ठरला.
सौजन्य: प्रज्ञा जोशी, संपर्क मित्र