प्रेमाच्या जाळ्यात अडकली अल्पवयीन; वारंवार शारीरिक संबंधाने एचआयव्ही पॉझिटिव्ह

    दिनांक :07-Oct-2025
Total Views |
पुणे,
minor-caught-hiv-positive पुण्यातल्या खडकी परिसरातील घडलेली धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे नातेसंबंधीत व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठवल्यामुळे ती एचआयव्ही पॉझिटिव्ह झाली. ही बाब ससून रुग्णालयातील तपासणीत समोर आली असून या  प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
minor-caught-hiv-positive

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि तिची मुलगी खडकी परिसरात राहतात. आरोपी कर्नाटकमधील असून तो फिर्यादीचा दूरचा नातेवाईक आहे. त्याने मुलीशी मोबाईलद्वारे संपर्क साधून ओळख वाढवली आणि प्रेमाचे आमिष दाखवून तिला पुणे तसेच कर्नाटकमधील आपल्या गावात नेऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले. minor-caught-hiv-positive हा अत्याचार २०२१ पासून सुरू होता. मुलगी आजारी पडल्यावर तिला ससून रुग्णालयात दाखल केले गेले, जिथे रक्त तपासणीत ती एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर तिने आईसमोर संपूर्ण घटना उघड केली.

या प्रकरणात आरोपीविरुद्ध पॉक्सो कायदा आणि भारतीय दंड विधानातील बलात्कार संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक संतोषी जाधव करत आहेत. minor-caught-hiv-positive आरोपी सध्या कर्नाटकात असून त्याचा शोध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मुलगी घरातून बेपत्ता झाली होती, ज्यावेळी खडकी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. सापडल्यानंतर तिला मुंढवा येथील एका आश्रमात ठेवण्यात आले, जिथे तिची तब्येत बिघडल्यामुळे केलेल्या वैद्यकीय तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला.