मला वाचवा...माझी पत्नी रात्री नागीण बनते!

    दिनांक :07-Oct-2025
Total Views |
सीतापूर,
My wife gets hnagin at night उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातील महमूदाबाद तहसीलमध्ये एका विचित्र तक्रारीमुळे पोलीसही गोंधळले आहेत. शनिवारी जिल्हास्तरीय अधिकारी जनतेच्या तक्रारींना ऐकत असताना एका व्यक्तीने अशी तक्रार केली की, त्याची पत्नी रात्री नागिणीमध्ये रूपांतरित होते आणि त्याला घाबरवते. या गोष्टी ऐकून उपस्थित अधिकारी आणि नागरिक सुद्धा चक्रावले.
 
 

My wife gets hnagin at night 
लोढासा गावातील मेराज नावाच्या व्यक्तीने जिल्हा दंडाधिकारी अभिषेक यांच्यासमोर हजर होऊन सांगितले की, त्याची पत्नी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे आणि रात्री तिला साप असल्याचे भासवून त्याला त्रास देते. मेराजने म्हटले की, तिच्या पालकांना हे सर्व माहित असले, तरीही त्यांनी माझ्याशी तिचे लग्न घडवले आणि माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. तक्रारदाराच्या अर्जावरून अधिकाऱ्यांनी कोतवाली पोलिसांना पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशमधील क्राइम आणि विचित्र तक्रारींच्या यादीत नवीनच नोंद झाली आहे.