गोंदिया, तिरोडाचे नगराध्यक्षपद मिळणार नामाप्र प्रवर्गाला

- सालेकसा, सडक अर्जुनीत सर्वसाधारण महिला, देवरी अनु जाती तर गोरेगावात अनु. जमाती व अर्जुनी मोरगावात महिला

    दिनांक :07-Oct-2025
Total Views |
गोंदिया,
backword class citizen राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतच्या आगामी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून प्रभाग रचना प्रसिद्धीनंतर सर्वांचेच लक्ष नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाकडे लागले होते. दरम्यान, आज, ६ ऑक्टोबर रोजी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने राज्याचे नगर विकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद व नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत काढली. ज्यामध्ये जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा नगर परिषद व ५ नगरपंचायत अध्यक्षपदाची आरक्षण सोडतही काढण्यात आली.
 
 

backword class citizen 
 
 
यात गोंदिया, तिरोडा नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी नामाप्र तर नगर पंचायतीत सालेकसा, सडक अर्जुनीत सर्वसाधारण महिला, देवरी अनुसूचित जाती तर गोरेगावात अनुसूचित जमाती व अर्जुनी-मोरगावात महिला आरक्षण जाहीर करण्यात आले. जिल्ह्यात दोन नगर परिषद व पाच नगरपंचायत असून आमगाव येथे नगर परिषद की नगरपंचायत हा तिढा अद्याप सुटलेला नसून न्यायप्रविष्ठ आहे. आगामी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच जिल्हा प्रशासन कामाला लागले होते. तर निवडणूक लढण्यास इच्छूक राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार तयारीला लागले होते. गणेशोत्सव, दुर्गा उत्सव व दसरा या सणानिमित्त इच्छूकांची निवडणुकीसाठीची धावपळ दिसून आली. अशात प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यावर इच्छूक उमेदवारांसह त्यांच्या पक्षाचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांतील महत्वाचे पद नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले होते. आपलाच उमेदवार नगराध्यक्ष व्हावा, अशी प्रत्येक पक्षाची इच्छा असते. तसे प्रयत्नही केले जातात.backword class citizen दरम्यान आज ६ ऑक्टोबर रोजी मुंबई मंत्रालयात नगर विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील नगर परिषद व नगरपंचायत नगराध्यक्ष पद आरक्षण सोडत काढण्यात आली. यात गोंदिया जिल्ह्यात गोंदिया व तिरोडा नगर परिषदचे नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षीत करण्यात आले. तर गोरेगाव नगरनपंचायतचे नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती, सडक अर्जुनी नगरपंचायतचे नगराध्यक्षप सर्वसाधारण (महिला), अर्जुनी मोरगाव नगरपंचायतचे नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती (महिला), देवरी नगरपंचायतचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती, सालेकसा नगरपंचायतचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी (महिला) आरक्षीत करण्यात आले आहे.
सदस्यपदाची सोडत ८ ऑक्टोबरला...
जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायत सदस्यपदाची आरक्षण सोडत ८ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार असून प्रारूप आरक्षणाची प्रसिद्धी ९ ऑक्टोबरला, त्यावर हरकत व सूचना १४ ऑक्टोबरपर्यंत मागविण्यात येणार आहे. तर अंतिम आरक्षण २८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतरच इच्छूक उमेदवार व राजकीय पक्षांच्या निवडणूक रणधुमाळीला खर्‍या अर्थाने सुरूवात होणार आहे.