प्रवीण निमोदिया महावीर इंटरनॅशनल विदर्भ झोनचे प्रेसिडेंट नियुक्त

    दिनांक :07-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
praveen-nimodiya : यवतमाळ जिल्ह्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे की प्रतिष्ठित महावीर इंटरनॅशनल संस्थेच्या विदर्भ झोन प्रेसिडेंट पदावर समाजसेवक प्रविण रमेशचंद्र निमोदिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
 
y7Oct-Pravin-Nimodiya
 
महावीर इंटरनॅशनल संस्था संपूर्ण देशभर सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व पर्यावरण या क्षेत्रात अनेक सेवा कार्ये करीत आली आहे. या कार्यांना नवी दिशा देणे, विविध केंद्रांमध्ये समन्वय प्रस्थापित करणे व विदर्भ क्षेत्रात नवे उपक्रम राबविण्याची जबाबदारी आता प्रविण निमोदिया यांच्या नेतृत्वाखाली पार पाडली जाणार आहे.
 
 
या नियुक्तीचे श्रेय इंटरनॅशनल प्रेसिडेंट सी.ए. अनिल जैन, सेक्रेटरी सोहनजी वेध, रिजन 9 चे वाइस प्रेसिडेंट दिलीपजी भंडारी तसेच महावीर इंटरनॅशनल यवतमाळ सेंटर येथील सर्व पदाधिकारी व सदस्यगण यांच्या मार्गदर्शन व सहकार्याला दिले जाते, ज्यांच्या प्रेरणेमुळे ही उपलब्धी शक्य झाली आहे.
 
 
निमोदिया यांच्या नियुक्तीमुळे विदर्भ क्षेत्रातील समाजोपयोगी उपक्रमांना नवी ऊर्जा व गती मिळेल तसेच संस्थेची प्रतिष्ठा अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.