वर्धा,
mahatma-gandhi-jayanti : एकता सेवा भावी संस्थेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून महात्मा गांधी विचार संमेलन व महात्मा गांधी सेवा गौरव पुरस्कार-२०२५ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन बुधवार ८ रोजी दुपारी २ वाजता शिवशंकर सभागृह, अग्निहोत्री कॉलेज कॅम्पस रामनगर करण्यात आले आहे.
अध्यक्षस्थानी पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री राहतील. उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेत्री गितांजली कुलकर्णी, माधुरी दीदी राजयोगिनी, सुरेश हिवराळे तर मुख्य अतिथी म्हणून सिने अभिनेता अशोक शिंदे यांची उपस्थिती राहिल. स्वागताध्यक्ष म्हणून एकता सेवा भावी संस्थेचे विदर्भ अध्यक्ष अनिल नरेडी, निमंत्रक संदीप चिचाटे, प्रा. अरुण पडघन यांची उपस्थिती राहिल.