सेवाग्राम हॉस्पिटलची मंत्रालयात चिरफाड!

* वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक

    दिनांक :07-Oct-2025
Total Views |
देवळी,
Sevagram Hospital : सेवाग्राम हॉस्पिटलमधील अव्यवस्था व गरीब रुग्णांवरील अन्यायाविरोधात आ. राजेश बकाने यांनी आज ७ रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत जनतेच्या पैशावर चालणार्‍या या हॉस्पिटलमध्ये जनतेलाच त्रास का असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आ. समिर कुणावार, आ. राजेश बकाने, आ. सुमित वानखेडे यांची उपस्थिती होती.
 
 
j
 
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सेवाग्राम हॉस्पिटलच्या अनागोंदी व्यवस्थापन, रुग्णांच्या हालअपेष्टा, सुविधा अभाव आणि डॉटरांच्या टंचाई या विषयावर आ. राजेश बकाने यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने आज ७ रोजी मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनात विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आरोग्य राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आ. समीर कुणावार, आ. सुमित वानखेडे, जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
 
बैठकीदरम्यान आ. राजेश बकाने यांनी आक्रमक भूमिकेतून सेवाग्राम हॉस्पिटलमधील वास्तवाचे धक्कादायक चित्र मांडले. शासनाचे ७५ टक्के अनुदान घेऊनही सेवाग्राम हॉस्पिटल गरीब रुग्णांकडून पैसे का वसुल करते? गरीब रुग्णांवर अन्याय आणि लुट सुरू ठेवायची परवानगी कुणी दिली असे प्रश्न उपस्थित केले. डॉटरांच्या कमतरतेबाबत संताप व्यत केला. रुग्णालयात डॉटर नाहीत, तज्ज्ञ नाहीत, यंत्रणा निकामी असल्याने या रुग्णालयात जनतेला उपचाराऐवजी त्रास मिळतो. त्यामुळे आरोग्य केंद्र की अन्यायाचे केंद्र असा प्रश्न उपस्थित केला. सेवाग्राम हॉस्पिटलचा सेवा शब्दच आश्चर्याचा वाटत असल्याचे आ. बकाने म्हणाले.
 
 
 
परिस्थिती सुधारली नाही, रुग्णांना योग्य सुविधा मिळाल्या नाहीत तर याचे परिणाम भयंकर असतील, सरकारने डोळेझाक केली तर आम्ही रस्त्यावर उतरून लढा उभारू असा इशारा यावेळी दिला. बैठकीदरम्यान आ. समीर कुणावार, आ. सुमित वानखेडे यांनी देखील हॉस्पिटलमधील गंभीर समस्यांकडे लक्ष वेधत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
 
 
यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सेवाग्राम हॉस्पिटलची सखोल चौकशी करून सर्व लोकप्रतिनिधींसमोर पारदर्शक अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले.