राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शेंबाळपिंपरी येथे विजयादशमी उत्सव साजरा

    दिनांक :07-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
शेंबाळपिंपरी, 
rss-vijayadashami-festival : हिंदू समाजात विजयादशमीच्या पवित्र सणाला शौर्य आणि शक्तीची जागृती होते. याच पवित्र सणाला आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य सुरू झाले आणि यंदा ते 100 वर्षे पूर्ण करीत आहे. जागतिक शांती आणि मानव कल्याणाच्या उद्देशाने शतकानुशतके चाललेल्या हिंदू समाजाच्या प्रदीर्घ प्रवासाचे हे मूर्तीमंत स्वरूप आहे, असे प्रतिपादन मुख्य अतिथी देविदास सूर्यवंशी यांनी केले.
 

y7Oct-Suryavanshi 
 
शेंबाळपिंपरी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रसार खूप झपाट्याने होत असल्याचे दिसत आहे. संघाच्या पथसंचलनाची सुरुवात विठ्ठल रुक्मिणी मंदिरावरून होऊन गावाच्या मुख्य रस्त्यावरून राधाकृष्ण मंगल कार्यालयामध्ये भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी शेंबाळपिंपरी खंड संघचालक संजय साकला, मंडळ कार्यवाहक शरद सूर्यवंशी व असंख्य ग्रामस्थांच्या समवेत प्रांत समरसता संयोजक आनंदीदास पाळेकर महाराज यांनी मार्गदर्शन केले.