नागपूर,
Shri Shivaji Science College : रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिट, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, नागपूर व असोसिएशन ऑफ वुमन मेडिकोस नागपूर, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन फर्टिलिटी सोसायटी, विष्णुजीकी रसोई यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी "डाएट फेस्ट" चे आयोजन केले आहे.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हिल फोर्ट पब्लिक स्कूल, नागपूरच्या संचालिका परिणिता फुके, विष्णूजी की रसोईचे संस्थापक विष्णू मनोहर यांची उपस्थिती राहणार.जनसामान्यांमध्ये पौष्टिक आहाराचे महत्व आणि गरज याबद्दल जनजागृती करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, काँग्रेस नगर, नागपूर येथे सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान आयोजित हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असल्याचे कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ. सुषमा देशमुख यांनी सांगितले. या "डाएट फेस्ट" चे मुख्य आकर्षण म्हणजे डाएट प्रदर्शन स्टॉल्स, शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन डाएट क्विझ, डाएट प्रिन्सेस, डाएट क्वीन, डाएट प्रिन्स फॅशन शो देखील आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी महिला आणि मुलांसाठी डाएट थीमवर पौष्टिक रेसिपी स्पर्धा, जुन्या काळातील विसरलेल्या पौष्टिक पाककृती, आरोग्यासाठी आहार विषयावर चर्चसत्राचे आयोजन करण्यात आले आहे. डाएट प्रदर्शन स्टॉल्समध्ये प्रथिने, लोह. कॅल्शियम, बाजरी, जीवनसत्त्वे, रणभज्य स्टॉल्स सारख्या मॅक्रो आणि मायक्रो पोषक घटकांचे विविध स्टॉल्स आहेत. इतर महत्त्वाचे स्टॉल्स होते - किशोरावस्था, गर्भधारणा, स्तनपान, रजोनिवृत्ती, विविध रोगांवरील आहार - उच्च रक्तदाब, हृदयरोग, लठ्ठपणा, मधुमेह मेलीटस, पीसीओएस, थायरॉईड, रेनल. नैसर्गिक हळदीचा स्टॉल, आवळा स्टॉल देखील होता. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. ओ. एस. देशमुख, प्रा. अतुल बोबडे. संयोजक डॉ. रूपाली पाटील भगत, रोटरी क्लब ऑफ नागपूरच्या एलिट अध्यक्षा सना पंडित, आयएमए अध्यक्ष डॉ. राजेश सावरबांधे, श्री. संजय वानखेडे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत. आरोग्य जागरूकता वाढवण्यासाठी सर्वांना मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.