नागपूर,
MBA राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एमबीए परीक्षेत धनंजय राव गाडगीळ सहकारी व्यवस्थापन संस्था, नागपूर येथील विद्यार्थी सुचेतन प्रकाश गभने याने विद्यापीठातून पहिला क्रमांक मिळवला आहे. त्याचा सीजीपीए ९.१४ आहे.
सुरेख यशाबद्दल बोलताना सुचेतन गभने आपले श्रेय पालक आणि शिक्षकांना दिले. त्याने सांगितले की, पालकांच्या मार्गदर्शनाशिवाय आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय हा महत्त्वाचा टप्पा गाठणे शक्य झाले नसते. MBA विद्यापीठाच्या वतीने सुचेतनच्या यशाबद्दल अभिनंदन व्यक्त केले आहे आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सौजन्य: माधुरी गाडगे, संपर्क मित्र