girads custard apple नागपूरचे संत्रा, भिवापूरची मिरची जशी गावांच्या नावाने प्रसिद्ध आहेत तशीच समुद्रपूर तालुयातील वायगावची हळद व गिरडचे सिताफळाने जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र आणि आजूबाजूचे राज्यात आपला गोडवा पसरवला आहे. या वर्षी सिताफळालाही अतिवृष्टीसह वातावरणाच्या बदलामुळे मोठा फटका बसल्याने उत्पादनात घट झाल्याने गोडवा महागला. झडनभर सिताफळासाठी २५० ते ३०० रुपये मोजावे लागत आहेत.
गिरड येथील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या फरीद बाबा दरगाह टेकटीच्या चारही बाजूंनी असलेल्या शेतात कित्येक वर्षांपासुन असलेल्या सिताफळांच्या झाडांना लागणारी ही सिताफळं दर्गाह प्रमाणेच महाराष्ट्रासह इतर प्रांतातही प्रसिद्ध असून ३० सप्टेंबरपासून सिताफळं निघायला सुरूवात होते. सिताफळ निघण्याचा कालावधी फत १५ ते २० दिवसांचा असल्याने या २० दिवसात येथे खरेदीदारांचे पावलं वळू लागले. मात्र, दरवर्षी मागणी जास्त व पुरवठा कमी असल्याने कित्येक शौकीनांना सिताफळाच्या चवीपासून वंचित राहावे लागते. येथे असलेली सिताफळांची झाडे अनेक वर्षांपुर्वीचे जुने असल्याने यातील काही झाडे दरवर्षी वाळून जातात. मात्र, कोणीही नवीन झाडांची लागवड करीत नाही. कृषी विभागाकडून इतर फळ झाडांकरिता मोठ्या प्रमाणात फलोत्पादन योजनेच्या माध्यमातून अनुदान दिले जाते.girads custard apple या भागात कमीत कमी शेतकर्यांच्या बांधावर तरी सिताफळ लागवडीसाठी शेतकर्यांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे. येथील जमिनीतील सिताफळाची चव कुठेही मिळत नसल्याने महाराष्ट्रासह बाहेर प्रांतातील ग्राहक सुद्धा वर्षभर वाट पाहत असतात. या सिताफळाचे विक्री व्यवस्थापन खूप सोपे असुन गावातील बसस्थानक चौकात विक्रेते टोपलीत सिताफळ घेऊन बसतात. मात्र, ग्राहकांची संख्या पाहता कमी वेळेतच त्यांचे टोपले खाली होतात. सध्या एक सिताफळ २५ ते ३० रुपये प्रती नग विकल्या जात आहे.