१५ राण्या, ३० मुले आणि खाजगी जेट...इस्वातिनीचा राजा पुन्हा चर्चेत

    दिनांक :07-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,
The King of Eswatini आफ्रिकन देश इस्वातिनीचा राजा मस्वाती तिसरा पुन्हा एकदा आपल्या विलासी जीवनशैलीमुळे चर्चेत आला आहे. अबू धाबी विमानतळावर उतरतानाचा त्याचा आणि त्याच्या १५ राण्या व ३० मुलांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इतक्या मोठ्या ताफ्यासह त्याच्या आगमनाने शेखांनाही आश्चर्याचा धक्का बसला. इस्वातिनीला पूर्वी स्वाझीलँड या नावाने ओळखले जात असे.
 
 
The King of Eswatini
 
हा व्हिडिओ त्यांच्या युएई दौऱ्यादरम्यानचा असल्याचे सांगितले जाते. राजाचा खाजगी जेट अबू धाबीमध्ये उतरल्यावर त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे भव्य स्वागत करण्यात आले. मात्र, त्यांच्या ताफ्यात १०० नोकर आणि सहाय्यक कर्मचारी असल्याने विमानतळावर सुरक्षा आव्हान निर्माण झाले आणि अधिकाऱ्यांना तीन टर्मिनल्स काही काळासाठी बंद करावे लागले. व्हिडिओमध्ये मस्वाती तिसरा पारंपारिक पोशाखात उतरतानाच दिसतो, The King of Eswatini त्याच्या मागोमाग अनेक महिला आणि मुले चालताना दिसतात. या दृश्यासह सोशल मीडियावर लिहिले गेले आहे, स्वाझीलंडचा राजा १५ बायका आणि १०० नोकरांसह अबू धाबीला पोहोचला. काही वापरकर्त्यांनी त्याची तुलना त्याच्या वडिलांशी सोभुजा दुसरा, ज्यांच्या १२५ बायका होत्या अशी केली आहे.
  
या आलिशान प्रवासानंतर मस्वाती तिसऱ्याच्या भव्यतेवर जगभर चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी त्याच्या देशातील आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्याच्यावर तीव्र टीका केली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, राजा मस्वाती III यांच्या राज्यात लोकांकडे वीज नाही, आणि हा माणूस खाजगी जेटमध्ये फिरतो. तर दुसऱ्याने प्रश्न केला, इस्वातिनी इतका श्रीमंत देश आहे का की राजाला ही विलासिता परवडेल? राजा मस्वाती तिसरा १९८६ पासून इस्वातिनीच्या सिंहासनावर आहे. त्याची एकूण संपत्ती अंदाजे १ अब्ज डॉलर्स इतकी मानली जाते. त्याच्याकडे अनेक आलिशान राजवाडे, लक्झरी कारचा ताफा आणि खाजगी विमान आहे. मस्वाती तिसरा दरवर्षी पारंपारिक रीड डान्स समारंभात नवीन वधूची निवड करतो ही त्याच्या देशातील जुनी सांस्कृतिक प्रथा आहे. गरीबीशी झुंजणाऱ्या इस्वातिनीमध्ये राजाचा असा ऐश्वर्यशाली जीवनप्रकार नेहमीच वादाचा विषय ठरतो, पण मस्वाती तिसरा मात्र या टीकांकडे दुर्लक्ष करून आपल्या राजेशाही थाटामाटात रमलेला दिसतो.