आर्णी नगर परिषद प्रभाग आरक्षण उद्या

-आर्णीत नगर परिषद निवडणुकीत नव्या चेहèयांना वाव -अनूसूचित जाती सर्वसाधारण निघाले आरक्षण -अनेक नेत्यांच्या आशेची झाली निराशा

    दिनांक :07-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
arni-nagar-parishad-ward-reservation : आर्णी नगर परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण काय निघेल, याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. यावर शिक्कामोर्तब झाले असून नप अध्यक्षासाठी अनुसूचित जातीकरिता आरक्षण निघाल्याने मागील अनेक महिन्यांपासून रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेल्या अनेकांचा हिरमोड झाला आहे. आता कोणता पक्ष कोणाला निवडणुकीत उतरवतो, कोण अपक्ष राहतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
 

y7Oct-Aarni-N-P 
 
आता ही निवडणूक आघाडी, महायुतीमध्ये लढली जाते की, प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढतो हेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. आघाडी, महायुती लढल्यास दुहेरी लढत होणार, हे स्पष्ट आहे. स्वतंत्र लढल्यास तिरंगी, चौरंगी लढतीचे चित्र राहणार आहे.
आर्णी नगर परिषदेची ही तिसरी निवडणूक आहे. पहिल्या निवडणुकीत नगरसेवकांतून अनिल आडे व आरिज बेग प्रत्येकी अडीच वर्ष अध्यक्ष होते. तर दुसèयावेळी अध्यक्षाची निवडणूक थेट जनतेतून झाली. ही निवडणूकही चांगलीच रंगतदार झाली.
अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेकरिता आरक्षित होते. शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राकाँ उमेदवारांसह इतरही उमेदवार रिंगणात होते. यामध्ये शिवसेनेच्या अर्चना मंगाम यांनी त्यावेळी राकाँच्या शिवनंदा रणमले यांचा मोठ्या फरकाने पराभव करून बाजी मारली होती.
 
 
यावेळी आरक्षण बदलले आहे. अनुसूचित जातीकरिता आरक्षण निघाले. यासाठी सर्वच पक्षांना उमेदवारांची चाचपणी करावी लागणार आहे. आरक्षणापूर्वी काही चेहरे नजरेसमोर होते. आता चित्र बदललेले आहे. काही आंदोलक चेहरेही या निवडणुकीत उतरणार, उतरवले जाणार आहेत.
आता नगरसेवकांसाठी आर्णी नपच्या सभागृहात बुधवारी आरक्षण काढण्यात येत आहे. ते कोणते आरक्षण निघते यावर बरेचकाही अवलंबून राहील व 11 प्रभागांमधून 22 नगरसेवक निवडून येतील. त्यासाठी प्रत्येक प्रभागात दोन उमेदवार राहतील. त्यात एक महिला व एक पुरुष राहील. सर्व पक्ष, अपक्ष निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आपला जोडीदार शोधून प्रचारकार्य सुरू करतील. पूर्ण चित्र या आरक्षणानंतर स्पष्ट होईल.