तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
yavatmal-news : असोसिएशन ऑफ सिव्हील इंजिनिअर्स, यवतमाळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अभियंता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त नवीन कार्यकारणीची घोषणा व इन्स्टॉलेशन सेरेमनीचा भव्य कार्यक्रम हॉटेल ओबेराय पॅलेस, धामणगाव रोड येथे पार पडला.
या कार्यक्रमात चेतन पळसोकर यांची अध्यक्षपदी, तर प्रवीण खांदवे यांची सचिवपदी निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. अभय पाटील (नागपूर) हे होते. अल्ट्राटेक सिमेंटचे मनोज काळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजि. विनायक कशाळकर व इंजि. मिलिंद वेळूकार यांनी केले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी घोषित करण्यात आलेली नवीन कार्यकारणी खालीलप्रमाणे.
अध्यक्ष : अभि. चेतन पळसोकर, सचिव : अभि. प्रवीण खांदवे, उपाध्यक्ष : अभि. अतुल देशपांडे, कोषाध्यक्ष : अभि. संकल्प डांगोरे, प्रोजेक्ट कॉर्डिनेटर : अभि. चंद्रशेखर मुळे, व अभि. तरुण हिंडोचा, प्रसिद्धीप्रमुख : अभि. वसंत गजभिये, कार्यकारणी सदस्य : अभि. सुनील समदुरकर, तज्ज्ञ सल्लागार समिती : अभि. सतीश फाटक, अभि. विनायक कशाळकर, अभि. संजय ठाकरे व अभि. मिलिंद वेळूकार.
नवीन अध्यक्ष अभि. चेतन पळसोकर यांनी आपल्या भाषणात सर्व सदस्यांच्या सहकार्याने संघटनेच्या कार्याला नवे बळ देण्याचा संकल्प व्यक्त केला. या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून नवीन कार्यकारणीचे अभिनंदन केले.