तभा वृत्तसेवा
पुसद,
sanjay-londhe : शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंगच्या वार्षिक आमसभेत 29 सप्टेंबर 2025 रोजी भाजपा पुसद जिल्हा सरचिटणीस संजय लोंढे यांची कार्यकारी संचालक म्हणून अविरोध निवड झाली.
नवनिर्वाचित कार्यकारी संचालक संजय लोंढे यांचा शाल,शीफळ व पुष्पगुच्छ देवून नुकताच सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजपा पुसद जिल्हा उपाध्यक्ष महेश नाईक, भाजप ज्येष्ठ आघाडी जिल्हाध्यक्ष विजय पुरोहित, धनंजय सक्तेपार, मकरंद सक्तेपार, भाजप उत्तर भारतीय आघाडी जिल्हाध्यक्ष संजय पांडेय, भाजप किसान मोर्चा अध्यक्ष ओमप्रकाश शिंदे व अविनाश साखरे उपस्थित होते. संजय लोंढे यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी सातत्याने योगदान दिले असून, त्यांच्या कार्यकाळात संस्थेची प्रगती गतीने होईल असा विश्वास याप्रसंगी महेश नाईक यांनी व्यक्त केला.