आर्वी,
arvi-municipal-council-general-election : येथील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत आज बुधवार ८ रोजी नगरपालिका कार्यालयात उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. याप्रसंगी मुख्याधिकारी किरण सुकलवाड, उपमुख्यधिकारी पद्माकर लाडेकर, कर निरीक्षक गणेश खडसे आदी उपस्थित होते.
आर्वी नगरपालिकेमध्ये १२ प्रभागासाठी १२ पुरुष व १३ महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले. यामध्ये सर्वसाधारण ७ महिला, अनुसूचित जाती २, नामाप्र ४ महिला राहणार असून नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला करिता राखीव असल्यामुळे आर्वी नगरपालिकेमध्ये महिलांचे वर्चस्व राहणार आहे.
प्रभाग १ साठी सर्वसाधारण महिला, प्रभाग २ अनुसूचित जाती महिला, प्रभाग ३ अनुसूचित जाती महिला, प्रभाग ४ अ साठी अनुसूचित जमाती, ब सर्वसाधारण महिला, प्रभाग ५ नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग ६ नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग ७ नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग ८ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, अ राखीव, प्रभाग ९ सर्वसाधारण महिला अ राखीव, प्रभाग १० नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग ११ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अ राखीव, प्रभाग १२ अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला अशी सोडत निघाली आहे.