विविध मागण्यांसाठी चालकांचा राज्यभर आंदोलनाचा इशारा

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
नागपूर, 
महाराष्ट्रातील Autorickshaw driver Andolan ऑटोरिक्षा चालक अनेक अडचणींना समोर जात आहे. सरकारकडे वेळोवेळी मागण्या करूनही ऑटोरिक्षा चालकांकडे दुर्लक्ष करत आहे. ऑटोरिक्षा चालकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आता राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय ऑटोरिक्षा चालक मालक संयुक्त कृती समिती महाराष्ट्र द्वारा घेण्यात आला आहे.
 
 
Auto
 
Autorickshaw driver Andolan ऑटोरिक्षा चालक मालक संघटना कृती समितीची समितीचे अध्यक्ष शशांक राव आणि समितीचे सरचिटणीस विलास भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय बैठक मुंबई येथे झाली. या बैठकीत विविध मुद्यांवर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वर्गीय आनंदराव दिघे साहेब ऑटोरिक्षा मिटर्ड टॅक्सी कल्याणकारी मंडळ या मंडळात अनेक त्रुट्या आहेत ज्यासाठी कृती समितीने अनेक निवेदने दिली आहेत. चालकांवर आर्थिक दंड ठोठविण्यात आले आहे. ई बाईक टॅक्सी प्रवाश्यांच्या दृष्टीने धोकादायक असल्याने परवानगी रद्द करण्यात यावी. अवैद्य ऑटोरिक्षा वाहतूक बंद करण्यात यावी.