ओडिशाने बापूना चषक जिंकला

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
- महाराष्ट्र उपविजेता
 
नागपूर, 
पहिल्या डावातील आघाडीमुळे ओडिशाने Bapuna Cup बापूना चषक जिंकला. बुधवारी व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ओडिशाने बापुना कप-२०२५ जिंकला, कारण त्यांच्या फलंदाजांनी महाराष्ट्राच्या पहिल्या डावातील १६८ धावांचा आकडा पार केला होता. ओडिशाकडून ओम मुंडे सर्वाधिक ५८ धावा, तर कर्णधार साईदीप महापात्राने २९ धावांचे योगदान दिले. महाराष्ट्राकडून किरण चोरमाळेने ५० धावा देऊन ४ गडी बाद केले होते. सामना अनिर्णीत संपला तेव्हा महाराष्ट्राने त्यांच्या दुसर्‍या डावात १ गडी बाद ३४ धावा केल्या होत्या.
 
 
Orisa
 
Bapuna Cup  ओडिशाने ८ गुण मिळवत २९ गुणांसह लीग टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले, तर २३ गुणांसह दुसर्‍या स्थानावर राहिला. बापुना ग्रुपचे अध्यक्ष पहहीज गिमी यांनी विजेत्या ओडिशाचा कर्णधार साईदीप महापात्रा याला चषक देण्यात आले. यावेळी व्हीसीएचे मानद उपाध्यक्ष डॉ. अविनाश देशमुख यांनी उपविजेता महाराष्ट्राचा कर्णधार दिग्विजय पाटील याला चषक प्रदान केले. या स्पर्धेतील केरळचा अभिषेक नायर याला सर्वोत्तम फलंदाज व ओडिशाचा मोहम्मद दानिश व्हीसीएचे सहसचिव गौतम काळे यांच्या हस्ते सर्वोत्तम गोलंदाज पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्हीसीएचे मानद सचिव संजय बडकस यांनी पावसाने थैमान घातले असतानाही खेळपट्ट्या व्यवस्थित करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या ग्राउंड्समनना विशेष रोख पारितोषिके देण्यात आली.