विकास बिसेन व सूमन शाहू सायकल स्पर्धेत प्रथम

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
नागपूर, 
bicycle race दयानंद आर्य कन्या महाविद्यालय, जरीपटका, डॉ.मधुकरराव वासनिक पीडब्ल्यूएस महाविद्यालय तसेच रोहिणी फाऊंडेशन संयुक्तपणे आंतरमहाविद्यालयीन सायकल शर्यतीत मुलांमध्ये विकास बिसेन व मुलींमध्ये सुमन शाहू प्रथम क्रमांकावर विजेते ठरले. मुले आणि मुलींसाठी २१ किमी व ११ किमी असे अंतर ठेवण्यात आले होते. पीडब्ल्यूएसचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रज्ञा बागडे व दयानंद आर्य कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. रितू तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा झाल्या. उद्घाटनाला विद्या सभेचे अध्यक्ष अशोक कृपलानी, सचिव राजेश लालवानी प्रमुख पाहुणे होते.
 
 
cuc
 
मुलांमध्ये प्रथम अरविंदबाबू देशमुख कॉलेजचा विकास बिसेन (३ हजार व सायकल), द्वितीय पंजाबराव कृषी विद्यापीठाचा रितेश धोटेला (२ हजार व सायकल), तिसरा सीपीसी कॉलेजचा दिगंत बापट (१ हजार व सायकल), चौथा पीडब्ल्यूएस कॉलेजचा सलीम खान (रू.७५०) चे बक्षीस पाचवे पारितोषिक विजेता बॅरिस्टर वानखेडे महा.चा अभिषेक यादव होता. त्याला रू.५०० चे बक्षीस मिळाले.
 
 
मुलींमध्ये प्रथम दयानंद आर्य कन्या महा.ची सुमन शाहू bicycle race  (३ हजार रोख व सायकल), याच महाविद्यालयाची दुसरी मयुरी कनोजिया (२ हजार व सायकल), तिसरी क्र.अरविंद बाबू देशमुख महाविद्यालयाची निधी तरारे (१ हजार व सायकल), चौथी विजेती आर्य कन्या महाविद्यालयाच्या खुशबू माणिकपूरे (७५० रुपये रोख व सायकल) ठरली. पाचव्या क्रमांकावर विजेती विद्या डोंबडे ५०० रू. रोख मिळाले. पारितोषिक वितरण समारंभाला पीपल्स वेल्फेअर सोसा.चे अध्यक्ष अ‍ॅड. मोहन वासनिक, सचिव मनोज वासनिक व रोहिणी फाउंडेशनचे उपाध्यक्ष सुनील घाणेकर उपस्थित होते. पर्यावरणाचे रक्षण करणे आणि चांगले आरोग्य राखणे हा उद्देश या स्पर्धेचा होता.