बुलढाणा नपा १५ प्रभागातील ३० जागांचे आरक्षण सोडत

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
बुलढाणा,
Buldhana municipal election बुलढाणा नगर परिषद निवडणूक आरक्षण सोडतीचा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी शरद पाटील मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या उपस्थित दि. ८ ऑक्टोबर रोजी ११ वाजता पार पडला.
 
 
Buldhana municipal election
 
 
या सोडतीमध्ये १५ प्रभागातील ३० जागांसाठी आरक्षण घोषित करण्यात आले. सर्वसाधारण खुला प्रवर्ग (९), सर्वसाधारण खुला (महिला ७), नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला (४), नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (४), अनुसुचित जाती खुला (२), अनुसुचित जाती महिला (३), अनुसूचित जमाती महिला (१), आरक्षण या जागांचा समावेश आहे. प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे प्रभाग १ अ (अ.जा) प्रभाग १ ब (सर्वसाधारण महिला), प्रभाग २ अ (नामाप्र), ब (सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक ३ अ (नामाप्र महिला) ब (सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक ४ अ (नापाप्र), ब (सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक ५ (अ. जा. महिला), ब (सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक ६ अ ( अ. जा. महिला), ब (सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक ७ अ (अ.जमाती महिला), ब (सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक ८ अ (नामाप्र महिला), ब (सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक ९ अ (अ.जा.) ब (सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक १० अ ( सर्वसाधारण महिला), ब (सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक ११ अ (नामाप्र) ब ( सर्वसाधारण महिला) प्रभाग क्रमांक १२ अ (नामाप्र)ब (सर्वसाधरण महिला) प्रभाग क्रमांक १३ अ (अ.जा महिला) ब (सर्वसाधारण) प्रभाग क्रमांक १४ अ (नामाप्र महिला) ब (सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक १५ अ (नामाप्र महिला), ब (सर्वसाधारण) अशा पद्धतीने आरक्षण घोषित करण्यात आले आहे.