शिस्तीत वागणारा देशच महान बनत असतो! : डॉ. उदय निरगुडकर

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
कारंजा लाड,
dr uday nirgudkar जपान या देशांमध्ये १९४५ साली अणुबॉम्ब टाकल्या गेला. त्यामुळे हा देश बेचिराख झाला होता. मात्र, जिद्द, शिस्त राष्ट्रप्रेम आणि महत्त्वकांक्षा यामुळे २५ वर्षात तो समर्थपणे उभा राहिला. जपान जर्मनी या देशातील लोक नियम पाळतात. शिस्तीत वागतात म्हणून हे देश महान बनले असे उद्गार जेष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी काढले. ते नानासाहेब दहीहंडेकर प्रांगणात सुरू असलेल्या शरद व्याख्यानमालेत बोलत होते.
 
 

उदय निरगुंडवर  
 
 
‘विकसित भारत’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रारंभी पत्रकार योगेश यादव व पंकज काटोले यांनी व्याख्यात्यांचे स्वागत केले. तर डॉ. खोना यांचे स्वागत चारुशीला परळीकर यांनी केले. परिचय डॉ. पद्माकर मिसाळ यांनी करून दिला. जगाच्या तुलनेत भारताचे स्थान काय आहे हे स्पष्ट करताना निरगुडकर पुढे म्हणाले की आज अमेरिकेकडे अमाप संपत्ती आहे, जर्मनीकडे प्रगत इंजीनियरिंग आहे, अरब देशांकडे क्रूड ऑइल आहे, आपल्याकडे काय आहे? तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात तरुणांची शक्ती आहे. ज्ञानेश्वर बोडके यांनी अतिशय हलाखी च्या परिस्थितीत शेतीत चमत्कार करून दाखवला. राहुल रस्तोगी, मिर शहा, प्रशांत गाडे, रावसाहेब घुगे, प्राची शेजगावकर यासारख्या अनेकांनी विविध क्षेत्रात नेत्रदीपक अशी कामगिरी केली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील मुले सुद्धा आघाडीवर आहेत. देशाने मंगळ यानाची मोहीम अतिशय कमी खर्चात पूर्ण केली होती, कारण त्यामध्ये महिलांचा सहभाग होता.
करोना काळामध्ये देशाने टेस्टिंग किट डेव्हलप केली होती. ही किट केवळ ५९ दिवसात ७ डॉलरमध्ये बनवली होती. शेतकर्‍याच्या मुलाने वॅसिन बनवली. आपला देश अनेक वेळा लुटला गेला. मात्र, ज्यांनी देश लुटला त्यांच्यापेक्षा आपल्या देशाचा विकास भरभक्कम झाला आहे. कॉम्प्युटर क्षेत्रात तर देशाने आमुलाग्र क्रांती केली आहे. कॉम्प्युटरचे ज्ञान हे भारताएवढे जगात कोणाकडेच नसल्याचे त्यांनी सांगितले.dr uday nirgudkar सॉफ्टवेअर इंजिनीअर्स ची संख्या खूप वाढत आहे. आज शेतीचे प्रश्न, तरुणांचे प्रश्न,आरक्षणाचे प्रश्न, आपल्याला दाखवले जातात, मात्र प्रगतीकडे घोडदौड करणार्‍या बाबी दाखवल्या जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. विकसित भारतासाठी प्रत्येक गावाचा तेथील लोकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे, हे सांगताना त्यांनी कारंजा येथील शरद व्याख्यानमाला व गोग्रीन फाउंडेशन करीत असलेल्या महत्त्वपूर्ण कार्याविषयी गौरवोद्गार काढले.तसेच कारंजा परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेने जर आयटीचे वर्कशॉप घेतले तर त्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुशील देशपांडे यांनी केले तर महेंद्र धनस्कर यांनी आभार मानले.निशिकांत परळीकर यांनी शारदा स्तवन म्हटले.