देवळीतील १० प्रभागांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
देवळी,
municipal-council-general-elections : देवळी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज नगरपरिषद कार्यालयात काढण्यात आली. यावेळी पिठासीन अधिकारी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अनिल गावित होते तर सहायक पिठासीन अधिकारी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी नेहा अकोडे होते. शाळकरी विद्यार्थ्यांच्या हस्ते पारदर्शकपणे ही सोडत काढण्यात आली.
 
 
jk
 
देवळी नगरपरिषद क्षेत्राची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १८,६९६ इतकी असून १० प्रभागांमधून २० नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. या निवडणुकीत महिलांसाठी १० जागा म्हणजेच ५० टक्के आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये अनुसूचित जातीच्या महिलांसाठी दोन, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी एक, नागरिकांच्या मागासवर्गीय महिलांसाठी तीन, तसेच सर्वसाधारण महिलांसाठी चार जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
 
 
प्रभाग १ (अ.) अनुसूचित जाती, (ब.) सर्वसाधारण महिला, प्रभाग २ (अ) अनुसूचित जाती महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग ३ (अ) अनुसूचित जाती महिला (ब) सर्वसाधारण, प्रभाग ४ (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग ५ (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, (ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग ६
 
 
(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ब) सर्वसाधारण, प्रभाग ७ (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग ८ (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ब) सर्वसाधारण, प्रभाग ९ (अ) अनुसूचित जमाती महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग १० (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, (ब) सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झाला आहे.
 
 
सोडत जाहीर होताच देवळीतील राजकीय वर्तुळात चैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे.