दिग्रस नप १२ प्रभागांचे आरक्षण जाहीर

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
५० टक्के महिला आरक्षणाने अनेकांचा हिरमोड
महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण
दिग्रस, 
Digras Municipal Council  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुधवार, ८ ऑगस्टला एकूण १२ प्रभागातील २५ सदस्यांकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण व महिला आरक्षण उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड आणि मुख्याधिकारी अतुल पंत यांच्या समक्ष ईश्वरचिठ्ठीने काढून जाहीर करण्यात आले. ४ वर्षांपासून प्रलंबित नगर परिषद निवडणूक प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. सोमवार, ६ ऑक्टोबरला अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. बुधवारी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले असून इच्छुक उमेदवारांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
Sodat
 
Digras Municipal Council नगर परिषद अंतर्गत २५ सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. या प्रभागांपैकी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या २५ टक्के जनगणनेनुसार ५ व ६ हे अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आले असून प्रभाग ३ ‘ब’ हा अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव जाहीर करण्यात आले. आरक्षण तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
प्रभाग ०१) अ - सर्वसाधारण (महिला), ब - सर्वसाधारण. प्रभाग ०२) अ - नामाप्र महिला, ब - सर्वसाधारण. प्रभाग ०३) अ - अनुसूचित जमाती ब - सर्वसाधारण. प्रभाग ०४) अ - नामाप्र महिला, ब - सर्वसाधारण. प्रभाग ०५) अ - अनुसूचित जाती, ब - सर्वसाधारण महिला. प्रभाग ०६) अ - अनुसूचित जाती महिला, ब - सर्वसाधारण.
प्रभाग ०७) ३ सदस्यांचा प्रभाग : अ - नामाप्र महिला, ब - सर्वसाधारण महिला, क - सर्वसाधारण. ०८) अनुसूचित जमाती, ब - सर्वसाधारण महिला. प्रभाग ०९) नामाप्र, सर्वसाधारण महिला. प्रभाग १०) नामाप्र, ब - सर्वसाधारण महिला. प्रभाग ११) अ - नामाप्र, ब - सर्वसाधारण महिला. प्रभाग १२) अ - नामाप्र महिला, ब - सर्वसाधारण.