वीज अधिकारी-कर्मचारी संपावर

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
-खाजगीकरणाचा आरोप
 
नागपूर, 
Electricity officers and employees on strike ऊर्जा सचिव, व्यवस्थापकीय संचालक, महावितरण व तिन्ही कंपन्यांच्या संचालकांसोबत झालेल्या बैठकीत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने आज मध्यरात्रीपासून ९ ते ११ ऑक्टोबर हा ७२ तासांचा संप अटळ झाला. ‘प्रशासनाने कृती समितीची कोणतीही बाजू ऐकून न घेतल्याने कोणताही तोडगा निघाला प्रशासन आपली भूमिका बदलत नसल्याने चर्चा निष्फळ’ ठरल्याचे कृती समितीने स्पष्ट केले आहे.
 
 
vij
 
निर्मिती, पारेषण व वितरण या तिन्ही वीज कंपन्यात अनेक पद्धतीने खाजगीकरण सुरू असल्याचे संपकर्त्यांचे म्हणणे आहे. महावितरणच्या कार्यक्षेत्रात समांतर वीज वितरण परवाना देण्यास, महावितरण कंपनीचे ३२९ उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने चालविण्यास, महापारेषण कंपनीमधील २०० कोटींवरील प्रकल्प टीबीसीबी भांडवलदारांना देण्यास व महापारेषण कंपनीचा शेअर मार्केटमध्ये आयपीओच्या माध्यमातून लिस्टिंग करण्यास, महानिर्मितीच्या जलविद्युत प्रकल्पाचे बीओटी तत्त्वावर खाजगीकरण करण्यास संपकर्त्यांचा विरोध आहे.
 
 
Electricity officers and employees on strike  राज्यातील ८६ हजार वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी व ४२ हजार कंत्राटी कामगारांनी संपात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे मोहन शर्मा, कृष्णा भोयर, महाराष्ट्र कामगार महासंघाचे सरचिटणीस विठ्ठल भालेराव, अरुण पिवळ, सहऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे लक्ष्मण राठोड, संतोष खुमकर, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेसचे (इंटक) दत्तात्रेय गुट्टे, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनचे संजय घोडके, संजय मोरे, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियनचे अध्यक्ष पी.बी. उके व डी.बी. बोर्ड तांत्रिक कामगार युनियनचे दिलीप कोरडे, लहाने यांनी केले आहे.
 
 
वीज प्रशासन सज्ज
दरम्यान, वीज अत्यावश्यक सेवा असल्याने राज्य शासनाने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम (मेस्मा) लागू केल्याने संप बेकायदेशीर ठरला आहे. महावितरणने आपत्कालीन व्यवस्था उभारली आहे. सुरळीत वीज पुरवठ्यासाठी पर्यायी मनुष्यबळ आहे. संपकाळात वीजसेवा देणारे अभियंते व कर्मचार्‍यांना सहकार्य करावे. वीज पुरवठा संदर्भात तक्रारी शहरी व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत.