मानोरा,
farmers march तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकर्यांना दिवाळीपूर्वी सरसकट आर्थिक मदत द्यावी या मुख्य मागणीसाठी ८ ऑटोबर रोजी मनोरा तहसील कार्यालयावर माजी आमदार अनंतकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समीती मानोरा येथुन तहसील कार्यालयावर धडकला.
यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी इंदीरा अनंतकुमार पाटील ह्या होत्या. यावेळी विठ्ठल घाटगे, ज्योती गणेशपुरे, शाम जाधव, अरविंद पाटील ज्ञायक पाटणी, अनिल राठोड व अनंतकुमार पाटील यांनी मोर्चाला संबोधित करतांना राज्य शासनावर आगपाखड करत तालुयातील सहाही मंडळा मधील शेतकर्यांना एकरी पन्नास मदत देण्यात यावी, बेरोजगार युवकांना भत्ता त्वरित देण्यात यावा तसेच शेतमजुराला पाच हजार रुपये खावटी देण्यात यावी. यावर्षी खरीप हंगामात मागील ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये तालुयात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेताला तलावाचे स्वरूप आले होते. पाण्यात असलेले सोयाबिन, कापूस, तूर, उडीद, मूग या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.farmers march शासनाने भरीव मदत द्यावी, पीक कर्ज माफ करावे अशा विविध मागण्या चे निवेदन मोर्च करांनी तहसीलदार यांना दिले. यावेळी डॉ. संजय रोठे, ठाकुरसिंग चव्हाण, निळकंठ पाटील, मनोहर राठोड, प्रकाश राठोड , इप्तेखार पटेल सह बहुसंख्येने शेतकरी सहभागी झाले होते.