तीन कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध आणि ब्लॅकमेल, महिला कंडक्टरला अटक

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
पुणे, 
female-conductor-arrested-in-pune पुण्यातून हनीट्रॅपची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला कंडक्टरने पैशांसाठी तीन कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध ठेवून त्यांची फसवणूक केली. महिला तिघाना सतत धमक्या देऊन त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू उकळत होती.
 
female-conductor-arrested-in-pune
 
पुण्यात गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विविध प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमुळे ही हनीट्रॅपची घटना अधिकच चिंताजनक ठरली आहे. १७ सप्टेंबर रोजी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात महिला कंडक्टरविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिस तपासात समोर आले की, आरोपीने पीडितांकडून पैसे उकळण्यासाठी बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. female-conductor-arrested-in-pune त्याचबरोबर, महिला पीडितांविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करत होती. अखेर पोलिसांनी या महिलेला अटक केली असून, पीएमपी महामंडळ प्रशासनाने तिला निलंबित केले आहे. पोलिस सर्व संबंधितांचा तपास करून प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.