भारताच्या कर्मचार्‍यांसाठी मोठा गिफ्ट...पुढील वर्षी ९ टक्क्यांनी पगारवाढ

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Gift for India's employees भारताच्या कर्मचार्‍यांसाठी पुढील वर्षी आनंदाची बातमी आहे. २०२६ मध्ये भारतातील कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी ९ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. ही माहिती जागतिक व्यावसायिक सेवा फर्मच्या वार्षिक वेतनवाढ आणि टर्नओव्हर सर्वेक्षणातून समोर आली आहे. जागतिक बाजारपेठेत आर्थिक अनिश्चितता असली तरी देशांतर्गत गुंतवणूक आणि धोरणात्मक पाठिंब्यामुळे भारतात पगारवाढ होण्याची अपेक्षा आहे.
 
 
Gift for India
 
 
बँकिंग आणि वित्तीय संस्थांना जास्त फायदा
सर्वेक्षणानुसार, पगारवाढीचे प्रमाण विविध क्षेत्रांमध्ये वेगवेगळे राहणार आहे. रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा पगार १०.९ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. बँकिंग आणि वित्तीय संस्थांमध्ये पगारवाढ १० टक्के होण्याची अपेक्षा असून, ही वाढ सर्वाधिक मानली जात आहे. ऑटोमोटिव्ह आणि व्हेईकल मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात ९.६ टक्के, इंजिनियरिंग डिझाइन सर्व्हिसेसमध्ये ९.७ टक्के, तर रिटेल उद्योगांमध्ये ९.६ टक्के पगारवाढ होण्याची शक्यता आहे.
 
 
सर्वेक्षणातून असेही दिसून आले की, कामगारांच्या गैरहजेरीचे प्रमाण कमी होत आहे. २०२५ मध्ये हे प्रमाण १७.१ टक्के, २०२४ मध्ये १७.७ टक्के आणि २०२३ मध्ये १८.७ टक्के होते. यामुळे उद्योगांमध्ये कामगारांची उपस्थिती वाढली असून कामकाज अधिक सुरळीत होत आहे. ही पगारवाढ कर्मचारी वर्गासाठी आर्थिक स्थैर्य आणि प्रोत्साहन देण्यास महत्वाची ठरणार आहे. देशांतर्गत गुंतवणूक, धोरणात्मक उपाययोजना आणि आर्थिक सुधारणा यामुळे पुढील वर्षी पगारवाढ होईल, असे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.