हिंदु एकता प्रतिष्ठानच्या वतीने रायगड मोहीमेचे आयोजन

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
रायगड मोहिमेत १५०० युवक सहभागी होणार
 
नागपूर, 
Hindu Ekta Pratishthan हिंदु एकता प्रतिष्ठानच्या वतीने १० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान, रेशीमबाग मैदान येथे रायगड मोहीमेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक जयंत कोकाटे, स्वप्नील साळुंके यांनी पत्रपरिषदेत यावेळी पत्रपरिषदेत आकाश मिश्रा, सुधीर भांपकर, गुडडू गोमासे, तुषार घारपेंडे आदी उपस्थित होते. दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्या मार्गदर्शनात रायगड मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून यात १५०० युवक सहभागी होणार आहे.
 
 
raigad-one
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने तेजोमय झालेल्या रायगड किल्ल्याचे वैभव आजच्या युवकांनी प्रत्यक्षात बघावे या हेतूने हिंदु एकता तर्फे रायगड मोहिम आखण्यात आल्याची माहिती जयंत कोकाटे यांनी दिली. या मोहिमेत नागपूर शहरातून १८ बसेस, २०० कार मधून युवकांचा विशाल ताफा रायगडाच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. युवापिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य, विचार आणि त्यागाशी जोडणे, तसेच हिंदू धर्माविषयी जागरूकता आणि हिंदूंचे एकत्रीकरण घडवणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याची स्वप्नील साळुंके यांनी दिली.
 
 
Hindu Ekta Pratishthan युवा पिढी विविध व्यसनासोबतच चुकीच्या प्रवृत्ती आणि दिशाहीनतेकडे झुकत आहे. अशावेळी त्यांना धर्म, संस्कृती आणि स्वाभिमानाच्या मार्गावर आणण्याचा हा प्रयत्न आहे. या मोहिमेत नागपूरच्या छोट्या मुलांचा ढोल-ताशा पथक रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर वादन करणार आहे. या मोहिमेत युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. सहभागातून उभी राहणारी हिंदू ऐक्य, राष्ट्रभक्ती स्वराज्यप्रेरणेची जाज्वल्य चळवळ देशहितासाठी मौलिक ठरणार आहे.